शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
4
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
5
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
6
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
7
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
8
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
9
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
10
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
11
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
12
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
13
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
14
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
15
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
16
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
17
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
18
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
19
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
20
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'

काही अपवाद वगळता लोकशाही मजबूत करण्याची भारताची परंपरा, पंतप्रधान मोदींचं मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2022 07:17 IST

नवी दिल्ली : स्वातंत्र्यानंतर देशातील सर्व सरकारांनी भारताला उच्च स्थानी बसविण्यासाठी योगदान दिलेले आहे. काही अपवाद वगळता लोकशाही मजबूत ...

नवी दिल्ली :स्वातंत्र्यानंतर देशातील सर्व सरकारांनी भारताला उच्च स्थानी बसविण्यासाठी योगदान दिलेले आहे. काही अपवाद वगळता लोकशाही मजबूत करण्याची देशाची गौरवशाली परंपरा आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी म्हटले आहे.

तीन मूर्ती भवन परिसरात नवनिर्मित पंतप्रधान संग्रहालयाचे उद्घाटन केल्यानंतर ते म्हणाले की, संवैधानिक लोकशाहीची उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी सर्व पंतप्रधानांनी योगदान दिले आहे. देशातील माजी १४ पंतप्रधानांच्या जीवनदर्शनाबरोबरच त्यांचे योगदान दर्शविण्यात आले आहे. असे आहे संग्रहालय-    पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचे जीवन व देशाच्या तंत्रज्ञानामध्ये त्यांचे योगदान संग्रहालयात समाविष्ट आहे. त्यांना मिळालेल्या सर्व भेटवस्तूही पाहायला मिळणार आहेत. माजी पंतप्रधान दिवंगत लाल बहादूर शास्त्री यांना ‘हुंड्यात’ मिळालेला चरखा, चौधरी चरण सिंह यांची डायरी व पी. व्ही. नरसिंह राव यांचा चष्मा पाहायला मिळणार आहे. -    मोरारजी देसाई यांची भगवद्गीता, गांधी टोपी, लेखणी, रुद्राक्षमाळाही पाहायला मिळणार आहे. -    अटलबिहारी वाजपेयी यांचे भारतरत्न पदक, चष्मा, घड्याळ तसेच चंद्रशेखर यांच्या हस्तलिखित डायरीही येथे आहेत. -    इंदिरा गांधी यांची छायाचित्रे, त्यांची भाषणे, पोखरण अण्वस्त्र चाचणीवरील सामग्री, बांगलादेश मुक्तिसंग्राम, बँकांचे राष्ट्रीयीकरण यावरील दस्तावेजाचा यात समावेश आहे.-    संगणकासाठी राजीव गांधी यांचा आग्रहही संग्रहालयात प्रदर्शित करण्यात आला आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी