शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
12
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
13
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
14
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
15
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
16
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
17
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
18
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
19
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
20
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!

भारताची ‘अंतराळशक्ती’ अधिक सामर्थ्यशाली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2019 02:09 IST

क्षेपणास्त्राद्वारे उपग्रह अचूक टिपून भारताने आता ‘अंतराळशक्ती’ अशी अधिक सामर्थ्यशाली असल्याचे सिद्ध केले आहे. ही मोहीम फत्ते करून भारताने आपली ताकद जगाला दाखवून दिली आहे.

नवी दिल्ली : क्षेपणास्त्राद्वारे उपग्रह अचूक टिपून भारताने आता ‘अंतराळशक्ती’ अशी अधिक सामर्थ्यशाली असल्याचे सिद्ध केले आहे. ही मोहीम फत्ते करून भारताने आपली ताकद जगाला दाखवून दिली आहे.शत्रूच्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांपासून बचाव करण्याचे तंत्रज्ञान विकसित करण्याचा ‘डीआरडीओ’चा एक कार्यक्रम गेली अनेक वर्षे सुरू आहे. त्याचाच भाग म्हणून आक्रमक क्षेपणास्त्र वाटेतच रोखणाची क्षमता सिद्ध करण्यात आली आहे. याच ‘इन्टरसेप्टर’ क्षमतेचा उपयोग ‘मिशन शक्ती’मध्ये केला गेला.संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने (डीआरडीओ) आखलेल्या आणि पूर्णत्वास नेलेल्या या मिशनचा मुख्य उद्देश कित्येक वर्षांच्या अथक परिश्रमाने विकसित केलेली पूर्णपणे देशी तंत्रशास्त्रीय क्षमता प्रत्यक्ष प्रयोगाने सिद्ध करणे हा होता. मिशन यशस्वी झाल्याने भारत अंतराळात उपग्रहांच्या स्वरूपात असलेल्या आपल्या बहुमोल साधनसंपत्तीचे रक्षण करण्यासही सक्षम असल्याचा इशारेवजा संदेशही यातून दिला गेला. आज उपग्रह नष्ट करण्यासाठी वापरले गेलेल्या याच तंत्रज्ञानाने भारत शत्रूने सोडलेली क्षेपणास्त्रेही लक्ष्यावर पोहोचण्यापूर्वीच रोखून नष्ट करू शकतो, हेही यामुळे अधोरेखित झाले.भारताने आतापर्यंत १०२ प्रक्षेपणे करून विविध प्रकारचे शेकडो उपग्रह अंतराळात सोडले आहेत. शिवाय ‘चांद्रयान’ व ‘मंगळयान’ या बाह्य अवकाशातील महत्त्वाकांक्षी मोहिमाही भारत हाती घेत आहे. यासाठी अंतराळ बाह्य धोक्यांपासून निर्धोक असणे व संभाव्य धोके परिणामकारकपणे परतवून लावण्याची क्षमता असणे देशाच्या सर्वंकष संरक्षण सिद्धतेचा एक अविभाज्य भाग आहे.नष्ट झालेल्या उपग्रहाचे काय होणार?अशा प्रकारे उपग्रह नष्ट केल्याने अंतराळात कचरा विखरून इतर उपग्रहांना व यानांना अडथळा येऊ नये याची काळजी घेतली गेली. याच उद्देशाने पृथ्वीपासून जवळच्या कक्षेतील उपग्रह ‘लक्ष्य’ म्हणून निवडला गेला.परिणामी, त्याचे भग्नावशेष गुरुत्वाकर्षणाने पृथ्वीकडे येतील व वातावरणाच्या घर्षणानेच बव्हंशी नष्ट होतील.

टॅग्स :Mission Shaktiमिशन शक्ती