शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधींच्या 'त्या' शब्दाचा अर्थ कोणालाच नाही कळला, होतोय गुगल सर्च

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2019 14:24 IST

एएनआयची एडिटर स्मिता प्रकाश यांनी काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रदीर्घ मुलाखत घेतली होती.

नवी दिल्ली- ज्या पद्धतीनं शशी थरूर यांनी वापरलेल्या ''फ्लोक्सिनॉसिनिहिलिपिलिफिकेशन'' या शब्दासाठी लोकांना गुगलचा आधार घ्यावा लागला होता. त्याच पद्धतीनं आता राहुल गांधी यांनी उच्चारलेल्या एका शब्दाचा लोक गुगलवर शोध घेत आहेत. एएनआयच्या एडिटर स्मिता प्रकाश यांनी काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रदीर्घ मुलाखत घेतली होती. त्यानंतर राहुल गांधींनी त्या पत्रकारावर आरोप केले होते.स्मिता प्रकाश या 'Pliable' पत्रकार असल्याचं ते म्हणाले होते. त्यानंतर स्मिता प्रकाश यांनीही राहुल गांधींच्या त्या विधानावर आक्षेप नोंदवला होता. देशातल्या सर्वात जुन्या पक्षाच्या अध्यक्षांनी अशा पद्धतीनं टीका करणं शोभनीय नसल्याचं त्या म्हणाल्या होत्या. त्यांनी टि्वट करत सांगितलं होतं की, तुम्हाला मोदींवर टीका करायची आहे तर जरूर करा, परंतु माझ्यावर टीका करणं हे आक्षेपार्ह आहे. राहुल गांधींनी वापरलेल्या 'Pliable' हा शब्द आता लोक गुगलवर सर्च करत आहेत.गुगलच्या माहितीनुसार प्लायेबल या शब्दाचा अर्थ एखाद्यासमोर शरणागती पत्करण्यासारखा आहे. तसेच एखाद्याच्या प्रभावात येणारी व्यक्ती, असाही या शब्दाचा अर्थ होतो. त्यानंतर काँग्रेसनं एक व्हिडीओ प्रसिद्ध करत प्लायेबलचा अर्थ आक्षेपार्ह नसल्याचं सांगितलं आहे. काँग्रेस म्हणते, ही तर आताच्या पत्रकारितेची दुर्दशा आहे. एखाद्या पत्रकारानं सहजतेनं शरणागती पत्करल्याच्या आरोपावर सोशल मीडियावरून तिखट प्रतिक्रिया येणं योग्य नसल्याचंही काँग्रेसनं म्हटलं आहे. 

‘द पॅरोडॉक्सियल प्राइम मिनिस्टर’ या पुस्तकाची माहिती देताना शशी थरूर यांनीही इंग्रजीतला असाच एक बुचकळ्यात टाकणारा शब्द वापरला होता. त्यामुळे सोशल मीडियावरील बहुतांश युजर्स संभ्रमात पडले होते. या शब्दाचा अर्थ तर दूरच पण उच्चार करणंही अवघड होता. ‘फ्लोक्सिनॉसिनिहिलिपिलिफिकेशन’ हा शब्द त्यांनी उच्चारला होता, त्याच अर्थ पहिल्यांदा कोणालाच समजला नव्हता. ‘विनाकारण कोणतीही गोष्ट निरर्थक ठरविण्याची सवय’ असा या शब्दाचा अर्थ असल्याचा गुगल सर्चमधून समोर आलं आहे. हा लॅटिन भाषेतील शब्द होता. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधी