शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

काबूलमधल्या अपहरण झालेल्या भारतीय महिलेची अखेर सुटका

By admin | Updated: July 23, 2016 14:25 IST

काबूलमध्ये राहणा-या व सुमारे सहा आठवड्यांपूर्वी अपहरण करण्यात आलेल्या ज्युडिथ डिसूजा या महिलेची अखेर यशस्वीरित्या सुटका करण्यात आल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयातर्फे देण्यात आली.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २३ - काबूलमध्ये राहणा-या व सुमारे सहा आठवड्यांपूर्वी अपहरण करण्यात आलेल्या ज्युडिथ डिसूजा या महिलेची अखेर यशस्वीरित्या सुटका करण्यात आल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयातर्फे देण्यात आली. कोलकाता येथील आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कची कर्मचारी असलेल्या ज्युडिथचे ९ जून २०१६ रोजी अपहरण करण्यात आले होते, अखेर आज तिची सुटका झाली. 
' सहा आठवड्यांपूर्वी अपहरण झालेल्या ज्युडिथ डिसूजा यांची सुखरुपरित्या सुटका झाल्याचे सांगताना मला खूप आनंद होत आहे' अशा शब्दांत परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी ही माहिती जाहीर केली. मात्र यासंबंधी कोणतीही अधिक माहिती देण्यास त्यांनी नकार दिला. तसेच ज्युडिथच्या सुटकेसाठी मदत करणा-या अफगाणिस्तानचेही स्वराज यांनी आभार मानले.
दरम्यान याप्रकरणी त्यांनी राजदूत मनप्रीत व्होरा यांचेही कौतुक केले. 
(काबूलमध्ये भारतीय महिलेचं अपहरण)
  •  
 ज्युडिथ डिसुजा आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कची पूर्णवेळ कर्मचारी  असून ९ जून रोजी इतर कर्मचा-यांसोबत कार्यालयाबाहेर उभी असताना तिचं अपहरण करण्यात आलं होतं. तालिबानने हे अपहरण केलं असल्याची शंका व्यक्त करण्यात येत होती. ज्युडितची सुटका व्हावी यासाठी आगा खान संस्था व परराष्ट्र मंत्रालयातर्फे अथक प्रयत्न करण्यात येत होते, अखेर आज त्या प्रयत्नांना यश मिळाले व ज्युडिथची सुखरूप सुटका झाली.