शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

दिलासादायक! ओमायक्रॉनवर भारतातील उपचार पद्धत प्रभावी; 358 संक्रमितांपैकी 114 रिकव्हर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2021 18:30 IST

आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी आज पत्रकार परिषद घेतली, यात त्यांनी ओमायक्रॉनबाबत महत्वाची माहिती दिली.

नवी दिल्ली: भारतात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होताना दिसत आहे, पण कोरोनाच्या नवीन ओमायक्रॉन व्हेरिएंटने सर्वांनाच चिंतेत टाकले आहे. पण, आता एक मोठा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. शुक्रवार सकाळपर्यंत देशात ओमिक्रॉनची 358 प्रकरणे नोंदवली गेली आहेत, पण त्यापैकी 114 जणांनी ओमायक्रॉनवर मात केली आहे.

पॉझिटिव्हिटी दर कमीआरोग्य सचिव राजेश भूषण यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी ओमायक्रॉनबाबत महत्वाची माहिती दिली. त्यांनी सांगितल्यानुसार, ओमायक्रॉनचा पॉझिटिव्हिटी रेटदेखील जगभरातील सरासरीपेक्षा कमी आहे. इतर देशातील पॉझिटिव्ह रेट 6% पेक्षा जास्त आहे. भारताचा पॉझिटिव्ह 5.3% आहे. गेल्या 2 आठवड्यांमध्ये भारताचा पॉझिटिव्ह रेट फक्त 0.6% राहिला आहे.

भारताची उपचार पद्धत प्रभावीराजेश भूषण पुढे म्हणाले की, कोरोनाच्या पहिल्या लाटेत आणि डेल्टा व्हेरियंटच्या वेळी राबवलेल्या उपचार पद्धती ओमायक्रॉनवरदेखील प्रभावी असल्याचे पुरावे आहेत. दरम्यान, केरळ आणि मिझोराममधील प्रकरणांमध्ये वाढ झाल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. म्हणाले की, सध्या देशात 20 जिल्हे आहेत, ज्यात केस पॉझिटिव्ह रेट 5 ते 10% च्या दरम्यान आहे. यापैकी 9 केरळमध्ये आणि 8 जिल्हे मिझोराममध्ये आहेत. देशातील फक्त 2 जिल्ह्यांमध्ये केस पॉझिटिव्ह दर 10% पेक्षा जास्त आहे आणि हे दोन्ही जिल्हे मिझोराममध्ये आहेत.

इतर देशात रुग्णांमध्ये वाढयावेळी भूषण यांनी ओमायक्रॉनच्या सध्याच्या परिस्थितीवरही महत्वाची माहिती दिली. ते म्हणाले, आतापर्यंत जगातील 108 देशांमध्ये 1,51,000 हून अधिक ओमायक्रॉनची प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. जगात कोरोनाची चौथी लाट पाहायला मिळत आहे, म्हणूनच आपण सावध असले पाहिजे.

ख्रिसमस आणि 31 डिसेंबरमुळे बाजारपेठेत वाढ झाली आहे. लोक मास्क न घालता, सामाजिक अंतर न पाळता खरेदीत व्यस्त आहेत, असला हलगर्जीपणा टाळावा. तर, भारतात शुक्रवारी सकाळपर्यंत 17 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये 358 ओमिक्रॉन रुग्ण आढळले असून, त्यातील 114 रुग्ण ठीक झाले आहेत.

89 टक्के लोकांना लसीचा पहिला डोस मिळाला

आरोग्य सचिव पुढे म्हणाले, आज आमच्याकडे 18,10,083 आयसोलेशन बेड, 4,94,314 ऑक्सिजन सपोर्टेड बेड, 1,39,300 ICU बेड, 24,057 बालरोग ICU बेड आणि 64,796 बालरोगतज्ञ नॉन-ICU बेड्स राष्ट्रीय स्तरावर उपलब्ध आहेत. सध्या देशभरात 89 टक्के प्रौढ लोकसंख्येला लसीचा पहिला डोस मिळाला आहे आणि पात्र लोकसंख्येपैकी 61 टक्के लोकांना कोविड-19 लसीचा दुसरा डोस मिळाला आहे.

राज्यांना रात्री कर्फ्यू लागू करण्याचा सल्ला

राजेश भूषण म्हणाले, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने 21 डिसेंबर रोजी राज्यांना रात्री कर्फ्यू, मोठ्या मेळाव्यावर नियंत्रण ठेवण्यासारखे निर्बंध लादण्याचा सल्ला दिला होता. बेड आणि इतर लॉजिस्टिकची क्षमता वाढवली पाहिजे आणि कोविडसाठी योग्य पद्धतींची काटेकोरपणे अंमलबजावणी केली पाहिजे. डीजी-आयसीएमआर डॉ बलराम भार्गव म्हणाले, अलीकडेच ओळखल्या गेलेल्या क्लस्टर्ससह, डेल्टा प्रकार भारतात अधिक आढळून येत आहेत. त्यामुळे, कोरोनाचे नियम आणि लसीकरण वाढवण्यासाठी आपल्याला अशीच रणनीती आखण्याची गरज आहे.

केंद्राने बूस्टर शॉटसाठी सुरू केला अभ्यास 

ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर कोरोनाच्या बूस्टर डोसची मागणी जोर धरत आहे. यातच आता केंद्र सरकारने देशातील 3 हजार लोकांवर बूस्टर डोसच्या चाचण्या घेण्याचे ठरवले आहे. या चाचणीच्या निकालावर बूस्टर डोसची गरज ठरवली जाईल. केंद्र सरकारने बूस्टर डोसची अत्यावश्यकता शोधण्यासाठी एक अभ्यास सुरू केला आहे, ज्यामध्ये सहा महिन्यांपूर्वी लसीचा दुसरा डोस घेतलेल्या लोकांचा समावेश असेल.

हा अभ्यास बायोटेक्नॉलॉजी विभागाच्या ट्रान्सलेशनल हेल्थ सायन्स अँड टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट (THSTI) द्वारे केला जात आहे. यामध्ये Covishield, Covaccine आणि Sputnik V लसींचा समावेश असेल. अभ्यासासाठी दिल्ली-एनसीआर, गुरुग्राम आणि फरीदाबाद येथून नमुने घेतले जातील.

टॅग्स :Omicron Variantओमायक्रॉनcorona virusकोरोना वायरस बातम्या