शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

हा भारतीय विद्यार्थी ठरला जगातला ‘टॉप कोडर’!; ८७ देशांतील १ लाख स्पर्धकांवर केली मात  

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2022 08:50 IST

Indian student becomes 'world's top coder' : कलश गुप्ता आयआयटी दिल्लीच्या संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकीच्या तृतीय वर्षाचा विद्यार्थी असून त्याने ८७ देशांतील तब्बल १ लाख स्पर्धकांवर मात करत टीसीएस कोडविटा-सीझन १० या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.

नवी दिल्ली : आयआयटी दिल्लीच्या (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी) कलश गुप्ता या विद्यार्थ्याने जगातील सर्वात मोठी कोडिंग स्पर्धा स्वतःच्या नावे केली आहे. कलश गुप्ता आयआयटी दिल्लीच्या संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकीच्या तृतीय वर्षाचा विद्यार्थी असून त्याने ८७ देशांतील तब्बल १ लाख स्पर्धकांवर मात करत टीसीएस कोडविटा-सीझन १० या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे याबाबत माहिती दिली. 

जगातील सर्वात मोठी संगणक प्रोग्रामिंग स्पर्धा कोडविटा ही एक प्रतिष्ठित कोडिंग स्पर्धा असून जगातील सर्वात मोठी संगणक प्रोग्रामिंग स्पर्धा म्हणूनही गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये याची नोंद आहे. कोडविटाची रचना एक खेळ म्हणून प्रोग्रामिंगला प्रोत्साहन देण्यासाठी करण्यात आली आहे. जगभरातील स्पर्धकांना त्यांची कौशल्ये एकमेकांसमोर मांडण्यासाठी प्रोत्साहित करणे हा त्याचा उद्देश आहे. सर्व स्पर्धकांना वास्तविक जीवनातील आव्हानांचा सामना करावा लागतो.

१० हजार डॉलरचे बक्षीसस्पर्धेचा विजेता ठरल्यावर कलशला १० हजार डॉलर रकमेचे बक्षीस देण्यात आले. तसेच, स्पर्धेतील चारही विजेत्यांना टीसीएसच्या संशोधन आणि नावीन्यपूर्ण संस्थेत इंटर्नशिपची संधी मिळेल. कलश व्यतिरिक्त, द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळविणारे स्पर्धक अनुक्रमे चिली आणि तैवानचे होते. आयआयटी दिल्लीचे संचालक रंगन बॅनर्जी यांच्या हस्ते  स्पर्धा जिंकल्यानंतर कलशचा सत्कार करण्यात आला. कलश गुप्ताने २०१८ मध्ये आयआयटीत प्रवेश घेण्यासाठी जेईईत देशभरात तिसरा क्रमांक मिळवला होता. 

‘टॉप-३मध्ये येईल असे कधी वाटले नव्हते’स्पर्धेच्या सुरुवातीला पहिल्या तिघांमध्ये येईल असेही मला कधी वाटले नव्हते. पण हा अद्भूत अनुभव होता. पहिल्यांदा माझ्यात आत्मविश्वास नव्हता, कारण पहिल्या प्रश्नासाठीच मला अपेक्षेपेक्षा जास्त वेळ लागला. मात्र, जसजशा कोडिंगच्या अन्य काही समस्या सोडवत गेलो तसतसा माझा आत्मविश्वासही उंचावला आणि मी पहिल्या तिघांमध्ये येईल याची खात्री होती, असे कलश म्हणाला.

टॅग्स :Educationशिक्षण