शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय कौशल्य व प्रतिभेचे जगाला घडले दर्शन, ‘INSविक्रांत’चे जलावतरण करताना पंतप्रधान मोदींचं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2022 06:53 IST

INS Vikrant: स्वदेशी बनावटीची पहिली विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांतचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी जलावतरण झाले.

कोची : स्वदेशी बनावटीची पहिली विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांतचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी जलावतरण झाले. अशा प्रकारच्या मोठ्या विमानवाहू युद्धनौका तयार करणाऱ्या मोजक्या देशांमध्ये आता भारताचाही समावेश झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, विक्रांत याचा अर्थ विजयी. आयएनएस विक्रांत केवळ एक भव्य युद्धनौका नाही तर ती भारतीय कौशल्य व प्रतिभेची साक्ष आहे.  

कोचीन शिपयार्ड लिमिटेड येथे झालेल्या या कार्यक्रमाला संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, नौदलप्रमुख ॲडमिरल आर. हरिकुमार व अन्य मान्यवर उपस्थित होते. मोदी यांनी सांगितले की, संरक्षण क्षेत्राला स्वावलंबी बनविण्यासाठी केंद्र सरकारने जे प्रयत्न सुरू केले, त्यातील आयएनएस विक्रांत हा महत्त्वाचा टप्पा आहे. अशा प्रयत्नांतूनच २१व्या शतकातील आत्मनिर्भर व समर्थ भारत घडणार आहे, असेही त्यांनी सांगितले. (वृत्तसंस्था) 

आयएनएस विक्रांत हा एकप्रकारे समुद्रात विहरणारा हवाईतळ किंवा तरंगते शहरच आहे. देशाच्या स्वातंत्र्यप्राप्तीच्या अमृतकाळामध्ये आयएनएस विक्रांतचे जलावतरण होत आहे, ही खूप मोठी घटना आहे.     - नरेंद्र मोदी, पंतप्रधान 

आयएनएस विक्रांत हे आत्मनिर्भर व महत्त्वाकांक्षी भारताचे प्रतीक आहे. आयएनएस विक्रांतसारख्या विमानवाहू युद्धनौकांची स्वदेशात होत असलेली बांधणी हा संरक्षणसिद्धतेतील प्रगतीचा मोठा टप्पा आहे.     - राजनाथ सिंह, संरक्षणमंत्री

काँग्रेसची टीकायुद्धनाैका बांधण्यासाठी आधीच्या सरकारांनी जे प्रयत्न केले होते, त्याचा उल्लेख करणे पंतप्रधान मोदी टाळले, अशी टीका काँग्रेसने केली. काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश म्हणाले की, जहाजाच्या बांधणीचा प्रारंभ तत्कालीन संरक्षणमंत्री ए. के. ॲन्टोनी यांच्या हस्ते झाला होता. तर, कोचीन शिपयार्ड, नेव्हल डिझाईन ब्युरो व भारतीय नौदलाचे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी कौतुक केले. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीindian navyभारतीय नौदल