शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

Indian Railway: रेल्वेची महत्वाची कंपनी विक्रीला काढणार; केंद्र सरकारकडून निर्गुंतवणुकीच्या हालचाली सुरु

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2022 12:10 IST

केंद्रीय मंत्रिमंडळ लवकरच भारतीय रेल्वेच्या भूमी लायसन्स फीला कमी करण्याच्या प्रस्तावावर विचार करू शकते. अर्थ मंत्रालयाने या शुल्काला जमिनीच्या बाजारमुल्याला ६ टक्क्यांवरून ३ टक्क्यांवर आणण्याचा प्रस्ताव तयार केला आहे.

चालू आर्थिक वर्षात केंद्र सरकारला काहीही करून आपले निर्गुंतवणुकीचे लक्ष्य पूर्ण करायचे आहे. यामुळे वर्षाला सुरुवात न झाली तोच केंद्र सरकारने कंपन्या विक्रीला काढण्यास सुरुवात केली आहे. याच महिन्यात केंद्र सरकार रेल्वेच्या एका कंपनीतील आपला हिस्सा विकण्याच्या तयारीला लाली आहे. 

सूत्रांनी बिझनेस टुडेला दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय मंत्रिमंडळ लवकरच भारतीय रेल्वेच्या भूमी लायसन्स फीला कमी करण्याच्या प्रस्तावावर विचार करू शकते. अर्थ मंत्रालयाने या शुल्काला जमिनीच्या बाजारमुल्याला ६ टक्क्यांवरून ३ टक्क्यांवर आणण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडचे ​​(कॉनकॉर) खासगीकरण होण्यास मदत होणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

गेल्या वर्षी, रेल्वे मंत्रालयाने आपल्या जमीन भाडेपट्टा धोरणाचा मसुदा कॅबिनेट नोट तयार केला होता. यामध्ये परवाना शुल्क 2 टक्क्यांवर आणण्याचे म्हटले होते. अर्थ मंत्रालयाने या प्रस्तावाला मान्यता दिली असून या महिन्याच्या अखेरीस केंद्रीय मंत्रिमंडळाचीही मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.

रेल्वेने एप्रिल 2020 मध्ये जमीन परवाना शुल्क प्रणाली सुरू केली. त्यानुसार रेल्वेची जमीन औद्योगिक कामासाठी वापरता येत होती. नंतर ही प्रणाली CONCOR साठी देखील लागू करण्यात आली. याआधी, CONCOR प्रत्येक कंटेनरनुसार जमिनीच्या वापराचे रेल्वेला भाडे देत असे, ते खूप स्वस्त होते. तर परवाना शुल्क हे जमिनीच्या वापरासाठी आकारले जाणारे वार्षिक शुल्क होते. केंद्रीय मंत्रिमंडळाने नोव्हेंबर 2019 मध्ये CONCOR मधील सरकारचा 30.8% हिस्सा तसेच व्यवस्थापन नियंत्रण खाजगी क्षेत्राला देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली होती. परंतू नवीन जमीन परवाना शुल्क धोरण लागू झाल्याने गुंतवणूकदारांनी त्याकडे पाठ फिरविली होती. 

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे