शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

आधार लिंक असेल, तरच रेल्वेचे ऑनलाइन रिझर्व्हेशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 07:22 IST

Indian Railway Reservation: रेल्वेचे रिझर्व्हेशन करताना काही मिनिटांत तिकिटे संपून  नशिबी येणारे 'वेटिंग' आता बदलेल. कारण रेल्वेने ऑनलाइन रिझर्व्हेशनसाठीचे नियम बदलले आहेत.  एजंट्सवर वेळेचे बंधनही आणले आहे. त्यामुळे तिकीट 'नॉट अव्हलेबल'चा ताप कमी होईल. 

नवी दिल्‍ली -  रेल्वेचे रिझर्व्हेशन करताना काही मिनिटांत तिकिटे संपून  नशिबी येणारे 'वेटिंग' आता बदलेल. कारण रेल्वेने ऑनलाइन रिझर्व्हेशनसाठीचे नियम बदलले आहेत.  एजंट्सवर वेळेचे बंधनही आणले आहे. त्यामुळे तिकीट 'नॉट अव्हलेबल'चा ताप कमी होईल. 

तात्काळ तिकिटाची हमी आणि प्रामाणिक प्रवाशांचे हित जपण्यासाठी  तात्काळ आरक्षण प्रणालीत रेल्वे महत्त्वपूर्ण सुधारणा  करणार आहे. १ जुलैपासून आयआरसीटीसीचे अधिकृत संकेतस्थळ आणि मोबाइल अॅपद्वारे तात्काळ तिकिटांचे आरक्षण फक्त आधारने प्रमाणित केलेल्या वापरकर्त्यांसाठी उपलब्ध असेल. १५ जुलै २०२५ पासून ऑनलाइन तात्काळ तिकीट आरक्षणासाठी आधार-आधारित ओटीपी प्रमाणीकरण अनिवार्य असेल.

ओटीपी आवश्यकसंगणकीकृत प्रवासी आरक्षण प्रणाली (पीआरएस) काउंटरवर आणि अधिकृत मध्यस्थांद्वारे (एजंट्स) आरक्षित तत्काळ तिकिटांसाठी आरक्षण करताना  वापरकर्त्याने दिलेल्या मोबाइल क्रमांकावर  ओटीपी प्रमाणीकरण पाठवणे आवश्यक असेल. 

एजंट्ससाठी कोणता वेळ?बल्क बुकिंगला आळा घालण्यासाठी एजंट्सना प्रारंभिक दिवस तत्काळ तिकिटे, बुकिंग विंडोच्या पहिल्या ३० मिनिटांच्या कालावधीत आरक्षित करता येणार नाहीत.  वातानुकूलित श्रेणीसाठी हे निर्बंध सकाळी १०:०० ते १०:३० पर्यंत व बिगर वातानुकूलित श्रेणीसाठी सकाळी ११:०० ते ११:३० या वेळेत लागू राहतील.

प्रवाशांना ॲप, वेबसाइटवर जाऊन काय करावे लागेल?या बदलांची नोंद घेण्याचे आवाहन रेल्वे मंत्रालयाने सर्व प्रवाशांना केले आहे. गैरसोय टाळण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने आपल्या आयआरसीटीसी युजर प्रोफाइलशी आधार लिंक केलेले असल्याची खातरजमा करावी. जर आधार लिंक केलेले नसेल तर तिकीट मिळणार नाही. 

सर्व विभागांना गेल्या सूचनासीआरआयएस आणि आयआरसीटीसीला प्रणालीत आवश्यक सुधारणा करण्याचे आणि सर्व विभागीय रेल्वे आणि संबंधित विभागांना त्यानुसार माहिती देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

 

 

टॅग्स :IRCTCआयआरसीटीसीIndian Railwayभारतीय रेल्वे