शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

देशासाठी काहीपण! आजारी बालकासाठी रेल्वेने १५०० किमींचे अंतर कापत १ लीटर दूध पोहोचवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2020 12:47 IST

देशातील ग्रामीण भागात आजही उंट आणि बकरीच्या दुधाचा वापर उपचारांसाठी केला जातो. तेलंगानाच्या सिकंदराबादमध्ये राहणाऱ्या एका कुटुंबाने २ वर्षांच्या मुलासाठी उंटीणीचे दूध मागितले होते. हे दूध लॉकडाऊनमुळे कुठेच मिळत नसल्याचे त्याने म्हटले होते. या गरजवंताला रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी मदत केली. 

मुंबई : भारतीय रेल्वे ही कोणत्याही संकटातून देशसेवा करतच असते. जरी प्रवासी वाहतूक बंद असली तरीही रेल्वे मालगाड्यांद्वारे देशभरात साहित्य पोहोचवत आहे. एका आजारी बालकाला उपचारासाठी हवे असलेले उंटीणीचे दूध तब्बल १५०० किमी दूरवर नेऊन पोहोचविण्यात आले आहे. 

देशातील ग्रामीण भागात आजही उंट आणि बकरीच्या दुधाचा वापर उपचारांसाठी केला जातो. तेलंगानाच्या सिकंदराबादमध्ये राहणाऱ्या एका कुटुंबाने २ वर्षांच्या मुलासाठी उंटीणीचे दूध मागितले होते. हे दूध लॉकडाऊनमुळे कुठेच मिळत नसल्याचे त्याने म्हटले होते. या गरजवंताला रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी मदत केली. 

हे कुटुंब त्यांच्या आजारी मुलासाठी राजस्थानहून दूध मागवत होते. मात्र, लॉकडाऊनमुळे त्यांना महिन्याभरापासून दूध मिळत नव्हते. सिकंदराबादपर्यंत दूध पोहचविण्यासाठी कुटुंबाने राजस्थानच्या फालनायेथील नोडल अधिकाऱ्याकडे मदत मागितली होती. या नोडल अधिकाऱ्याने मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाचे मुख्य व्यापार निरिक्षक जितेंद्र मिश्रा यांच्याशी संपर्क साधून या कुटुंबियांची समस्या सांगितली. 

प्रवासी वाहतुकीतही कधी फायदा न पाहिलेल्या रेल्वे खात्याने लगेचच या बालकाला दूध पोहोचविण्याचा निर्णय घेतला. यानंतर सारी सुत्रे हलली आणि फालनाहून सिकंदराबादला थेट पार्सल सेवा नसल्याने हे गूध लुधियानाहून बांद्र्याला पाठविण्यात आले. त्यानंतर तेथून ते दूध दुसऱ्या ट्रेनने सिकंदराबादला पोहोचविण्यात आल्याचे, मिश्रा यांनी सांगितले. एनबीटीने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

किती तास लागले?दूध हे नाशिवंत असल्याने जितेंद्र यांनी राजस्थान, मुंबई आणि सिकंदराबादच्या रेल्वे अधिकाऱ्यांना विश्वासात घेत कमीत कमी वेळात ते पोहोचेल अशी व्यवस्था केली. बांद्रा ते सीएसएमटी स्थानकात हे दूध विशेष वाहनाने एका तासात पोहोचविण्यात आले. राजस्थान ते सिकंदराबादला पोहोचायला २८ तास लागले. कोरोना संकट काळात रेल्वे वैद्यकीय साहित्य, औषधे, मास्क आदी देशभरात पोहोचवत असल्याचे जितेंद्र मिश्रा यांनी सांगितले. 

अन्य महत्वाच्या बातम्या...

CoronaVirus पुण्याच्या प्रसिद्ध कंपनीने घेतली मोठी 'रिस्क'; 1000 रुपयांत कोरोना लस आणणार

हॅलो, मी ज्योतिरादित्य शिंदे बोलतोय!; निवडणूक चिंतेमुळे राजकीय वातावरण तापले

Palghar Mob Lynching : आणखी तीन पोलिसांचे निलंबन तर ३५ जणांची तडकाफडकी बदली 

 

खळबळजनक! प्रेयसीच्या घराच्या उंबरठ्यावर प्रियकराची हत्या; संपूर्ण गाव गेलं हादरून

 

लॉकडाऊनमध्ये कुटुंबावर आली बेताची स्थिती, कलहातून बेरोजगार मुलाने केली वडिलांची हत्या

 

Lockdown : जेवण वाटपाच्या बहाण्याने टाकला ज्वेलर्स दुकानावर दरोडा, लुटले कोटी रुपये

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndian Railwayभारतीय रेल्वेmilkदूध