शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

दहशतवादी हल्ल्यात भारतीय जवान शहीद

By admin | Updated: October 29, 2016 00:11 IST

सर्जिकल स्ट्राइकनंतर गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन होत आहे.

ऑनलाइन लोकमतजम्मू-काश्मीर, दि. 28 - सर्जिकल स्ट्राइकनंतर गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन होत आहे. दहशतवाद्यांच्या आडून पाकिस्तान सीमेपलीकडून भारतीय चौक्यांवर हल्ले करत आहे. काही तासांपूर्वीच दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात कुपवाडामध्ये माछिल सेक्टरमध्ये भारताचा एक जवान शहीद झाला. या दहशतवाद्यांनी भारतीय जवानाचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत नियंत्रण रेषेजवळ फेकला होता. त्यानंतर पळून जात असताना भारतीय सैनिकांनी केलेल्या गोळीबारात त्यातील एक दहशतवादी ठार झाला. आम्ही याला चोख प्रत्युत्तर देऊ, असंही भारतीय लष्कराच्या प्रवक्त्यानं म्हटलं आहे. सीमारेषेजवळ गस्त घालणाऱ्या एका तुकडीवर पाकव्याप्त काश्मीरमधून रात्री नऊच्या दरम्यान दहशतवाद्यांनी गोळीबार केला. या गोळीबारात गस्तीवर असलेला शीख रेजिमेंटचा एक जवान शहीद झाला. गोळीबार करून दहशतवादी पलायन करत असताना भारतीय सैनिकांच्या हल्ल्यात एका दहशतवाद्याचा खात्मा झाला. भारतानं या हल्ल्याला सडेतोड प्रत्युत्तर देत दहशतवाद्याला यमसदनी धाडलं. काल देखील पाकिस्ताननं दहशतवाद्यांच्या आडून भारतावर गोळीबार केला होता. गोळीबारात भारताचा एक जवान शहीद झाला होता. दरम्यान, काल केलेल्या गोळीबारात भारतानं पाकिस्तानच्या 15 रेंजर्सना यमसदनी धाडलं. गुरुवारपासून जम्मू काश्मीरातील ५ सेक्टर्समध्ये जोरदार धुमश्चक्री सुरू होती. संध्याकाळी पाचच्या सुमारास पाकिस्तानी सैन्यानं अचानक गोळीबार सुरू केला. त्यानंतर भारतीय जवानांनी पाकिस्तानातील शकरगढमध्ये तैनात पाकिस्तानच्या सैन्याला सळो की पळो करून सोडलं. सीमा न ओलांडता भारतीय सैन्यानं जम्मू-काश्मीरच्या सांबामधून शकरगढवर हल्ला चढवून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलं. सर्जिकल स्ट्राईकनंतर पाकिस्तानकडून आतापर्यंत 56 वेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन झालं आहे. मात्र, भारतानं देखील प्रत्येक वेळी पाकिस्तानच्या हल्ल्यांना चोख उत्तर दिलं आहे.