शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत, माहिम स्थानकात पॉइंट बिघाड; फास्ट ट्रॅकवरील लोकल उशीराने
2
"खाने के लाले, लडने में सबसे आगे...!" रडत-पडत कर्ज मिळवलं अन् संरक्षण बजेट २०% नं वाढवलं; दहशतवाद पोसणाऱ्या PAK चा खरा चेहरा समोर
3
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
4
राजा रघुवंशी हत्याकांडातील आरोपीला पाहताच राग अनावर, प्रवाशाने ऑन कॅमेरा सणसणीत लगावली, VIDEO व्हायरल
5
आजचा अग्रलेख: हे पवार, ते पवार आणि 'पॉवर'
6
एक गेली आता दुसरी आली! श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील संघाला ट्रॉफी जिंकण्याची संधी
7
अवघ्या ९० चेंडूत १९० धावा! वैभव सूर्यवंशीची झंझावती खेळी, मैदानात पाडला षटकारांचा पाऊस
8
शुभांशू शुक्ला यांची अंतराळ मोहीम पुन्हा स्थगित; ऑक्सिजन गळतीमुळे मिशनला लागला ब्रेक
9
जीप-ट्रकची भीषण टक्कर; वधुसह ५ जणांचा जागीच मृत्यू, तर वरासह ८ प्रवासी गंभीर जखमी
10
Unclaimed Bank Deposits : बँकांमध्ये ७८,२१३ कोटी रुपये बेवारस पडून! सरकार प्रत्येक जिल्ह्यात वाटणार पैसे, काय आहे योजना?
11
बॉलिवूड अभिनेत्रीला स्टेज ४ ब्रेस्ट कॅन्सरचं निदान, लेकीला अमेरिकेला पाठवलं; म्हणाली...
12
"हो, मी बाबा होणार आहे...", अरबाज खानने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "नर्व्हस आहेच..."
13
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
14
घरातून पळून जाऊन लग्न करणाऱ्या जोडप्यांना दणका, हायकोर्टाच्या आदेशानंतर नियमात बदल!
15
SIP देईल छप्परफाड रिटर्न की RD नं बनाल कोट्यधीश? तुमच्या पैशांचा खरा 'बाहुबली' कोण, जाणून घ्या
16
सोनम रघुवंशीने केलेला 'तो' हट्ट ऐकला नसता, तर कदाचित राजा रघुवंशीचा जीव वाचला असता...
17
तुमच्या स्वप्नातील गाडी महागणार? चीनच्या 'या' निर्णयामुळे ऑटो मार्केटमध्ये खळबळ!
18
भाईजान इज बॅक! सलमान खानने ५९ व्या वर्षी घटवलं वजन, फोटो पाहून चाहतेही अवाक; म्हणाले, "हँडसम..."
19
फ्लॅटची साईज वाढली पण कमी झाला कार्पेट एरिया; घर घेणाऱ्यांना होतंय डबल नुकसान, समजून घ्या
20
Mumbai: उत्पन्नामुळं देशभरात चर्चेत आलेल्या मुंबईतील 'त्या' रिक्षावाल्याच्या पोटावर पाय!

भारतीय गुंडांचा अमेरिकेत 'डंकी'पद्धतीने प्रवेश; लॉरेन्स बिश्नोई टोळीचेही आवडते ठिकाण बनले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2024 15:01 IST

भारतीय गुंड आता अमेरिकेत आपला नवा तळ बनवत आहेत. डंकी पद्धतीने इतर देशात प्रवेश करत आहेत.

लॉरेन्स बिश्नोईमुळे आता देशात पुन्हा एकदा टोळीयुध्द वाढल्याचे समोर आले आहे. भारतात गुन्हेगारी करायची आणि परदेशात लपायचे. परदेशात राहणाऱ्या भारतीय गुंडांना आता नवीन लपण्याचे ठिकाण सापडले आहे. आतापर्यंत बहुतांश भारतीय गुंड कॅनडा आणि आखाती देशांमध्ये कार्यरत होते, पण आता ते त्यांचे ठिकाण बदलत आहेत. 

दुबईतून हद्दपार करण्यात आलेल्या लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या शुटरने पोलिस चौकशीत खुलासा केला आहे की, लॉरेन्स बिश्नोई टोळीसह भारतातून वॉन्टेड गुन्हेगारांसाठी अमेरिका आता नवीन ठिकाण बनत आहे. आरोपीने सांगितले की, भारतातून फरार झालेले गुंड बनावट पासपोर्टवर डंकी मार्गाने अमेरिकेत प्रवेश करत आहेत.

"लॉरेन्स बिश्नोईचा जेलमधून शूटर्सना कॉल; पोलिसांना घाबरू नका, आपल्याकडे वकिलांची फौज"

दिल्लीतील नजफगडमध्ये दुहेरी हत्याकांड घडवून आणल्यानंतर लॉरेन्स गँगचा शार्प शूटर हर्ष उर्फ ​​चिंटू याने पंजाबमधून बनावट पासपोर्ट बनवला होता. हर्ष उर्फ ​​चिंटूच्या या पासपोर्टची प्रत समोर आली आहे. हा पासपोर्ट पंजाबच्या जालंधर येथून २६ मार्च रोजी जारी करण्यात आला होता. पासपोर्टमध्ये हर्षचे नाव प्रदीप कुमार असे लिहिले आहे. हर्षने सांगितले की, अशा अनेक गुंडांना अमेरिकेत जाण्यासाठी बनावट पासपोर्ट बनवले जात आहेत.

आरोपीने चौकशीदरम्यान सांगितले की, आधी त्याला पंजाबचा बनावट पासपोर्ट मिळाला, त्यानंतर तो भारतातून शारजाहला गेला. शारजहानहून तो पुन्हा बाकूला गेला आणि इथून युरोपातल्या एका देशात. यानंतर डंकी मार्गाने अमेरिकेत प्रवेश करण्याचा त्याचा प्लॅन होता.

गोल्डी ब्रार, अनमोल बिश्नोई, रोहित गोदारा, मॉन्टी मान, पवन बिश्नोई आणि लॉरेन्स बिश्नोई गँगचा अँटी गँग गँगस्टर हिमांशू भाऊ यांच्यासह अनेक वॉन्टेड गुन्हेगार सध्या अमेरिकेत आहेत, हे सर्वजण डंकी पद्धतीने अमेरिकेत पोहोचले होते. आता हे सगळे गुंड अमेरिकेत बसून भारतात गुन्हे घडवत आहेत.

टॅग्स :AmericaअमेरिकाPoliceपोलिस