शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

Earthquake in Turkey: तुर्कीच्या भूकंपात भारतीयाचा मृत्यू; हॉटेलच्या ढिगाऱ्यात सापडला मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2023 19:58 IST

Earthquake in Turkey: तुर्की आणि सिरीयामध्ये विनाशकारी भूकंपात आतापर्यंत २४ हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. जगभरातील देशांनी याठिकाणी आपापले सैन्य पाठवून बचावकार्याला सुरुवात केली आहे.

महाविनाशकारी भूकंपात तुर्की आणि सिरिया हे देश उद्ध्वस्त झाले आहेत. या भूकंपात आतापर्यंत २४ हजारांवर लोक मृत्यूमुखी पडले आहेत. यामध्ये केवळ तुर्की किंवा सिरियाचेच नाहीत तर अन्य देशांचे नागरिकही आहेत. भूकंपानंतरचा पाचवा दिवस भारतासाठी धक्का देणारा ठरला आहे. 

Earthquake in Turkey: भूकंपग्रस्त तुर्कीमध्ये ऑस्ट्रियाने अचानक मदतकार्य थांबविले; कारण काय?

तुर्कीच्या भूकंपात एका भारतीयाचा मृत्यू झाला असून त्याचा मृतदेह एका हॉटेलच्या मलब्याखाली सापडला आहे. तुर्कीतील भारतीय दूतावासाने याची माहिती दिली आहे. विजय कुमार हे गेल्या पाच दिवसांपासून बेपत्ता होते. त्यांचा मृतदेह मालत्या येथील हॉटेलच्या ढिगाऱ्यात सापडला आहे. ते तुर्कस्तानला बिझनेस ट्रिपवर गेले होते.

दूतावासाने विजय कुमार यांचे कुटुंब आणि प्रियजनांप्रती तीव्र संवेदना व्यक्त केल्या आहेत. आम्ही शक्य तितक्या लवकर त्याचा मृतदेह त्याच्या कुटुंबीयांकडे नेण्याची व्यवस्था करत आहोत, असे दुतावासाने म्हटले आहे. 

तुर्की आणि सिरीयामध्ये विनाशकारी भूकंपात आतापर्यंत २४ हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. जगभरातील देशांनी याठिकाणी आपापले सैन्य पाठवून बचावकार्याला सुरुवात केली आहे.  अनेक देशांचे सैन्य तुर्कस्तान आणि सीरियामध्ये मदतीसाठी पोहोचले आहे. भारताकडून एनडीआरएफची टीमही मैदानावर हजर आहे. मदत साहित्यही पोहोचवण्यात आले आहे. भारतीय लष्कराने तुर्कस्तान आणि सीरियामध्ये आपले लष्करी रुग्णालय देखील उघडले आहे. मृतांचा आकडा 24 हजारांच्या पुढे गेला आहे. तो आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. 

टॅग्स :Earthquakeभूकंप