शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकेत भारतीय दाम्पत्याला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2018 03:43 IST

दक्षिण भारतीय (टॉलिवूड) अभिनेत्रींचे अमेरिकेत सेक्स रॅकेट चालवणाऱ्या भारतीय जोडप्याला तेथील पोलिसांनी अटक केली आहे.

हैदराबाद : दक्षिण भारतीय (टॉलिवूड) अभिनेत्रींचे अमेरिकेत सेक्स रॅकेट चालवणाऱ्या भारतीय जोडप्याला तेथील पोलिसांनी अटक केली आहे. किशन मोदुगुमुडी उर्फ श्रीराज चोन्नूपत्ती (३४) व पत्नी चंद्रा (३१) अशी त्यांची नावे आहेत. अमेरिकेमध्ये शोज करण्याच्या बहाण्याने अभिनेत्रींना अमेरिकेत बोलावून त्यांना ते सेक्स रॅकेटमध्ये ढकलत असल्याचे उघड झाले आहे.शिकागोच्या कोर्टात ४२ पानी तक्रार दाखल झाल्यानंतर त्याआधारे पोलिसांनी तपास सुरू केला. त्यात हे जोडपे हा उद्योग करीत असल्याचे उघड झाले. किशन उर्फ श्रीराज पूर्वी दक्षिण भारतात चित्रपटसृष्टीत प्रोडक्शन मॅनेजर होता. त्यामुळे त्याच्या इथे ओळखी होत्या. या जोडप्याने ११ मे २०१७ ते २२ जानेवारी २०१८ या काळात अनेक मुलींना देहविक्रीच्या व्यवसायात ढकलल्याचा आरोप आहे. ते मुलींना व अभिनेत्रींना अमेरिकेत घेऊन जात व तेथे त्यांना हॉटेलात वा आपल्या घरी 'कैद' करून ठेवत. अमेरिकेतील तेलुगू वा इतर भारतीय भाषिक सोहळ्यांत त्यांना देहविक्रीसाठी घेऊन जात होते, अशी तक्रार होती.पोलिसांनी या वर्षी १६ फेब्रुवारी या जोडप्याच्या घरी छापा घातला, तिथे एक बॅग सापडली. त्यात गर्भनिरोधके व एक वही होती. वहीत अनेक अभिनेत्रींच्या नावे व त्यांच्या उपलब्ध तारखांची नोंद होती. शिकागो कोर्टाने दोघांची रवानगी तुरुंगात केली आहे. >अभिनेत्रीची तक्रारसिनेसृष्टीतील कास्टिंग काऊचवर आवाज उठविणारी अभिनेत्री श्री रेड्डी हिनेही या सेक्स रॅकेट संदर्भात धक्कादायक माहिती दिली आहे. या जोडप्याने माझ्याशीही संपर्क साधला होता. कलाकारांना कामे वा आॅफर्स मिळत नाहीत, तेव्हा ते देहविक्रीच्या उद्योगाकडे वळू शकतात. अमेरिकेत त्यांना १ हजार डॉलर्स (सुमारे ६५ हजार रुपये) इतकी किंमत मिळते. अर्थात हे त्या अभिनेत्रीची लोकप्रियता व तिला मिळालेली प्रसिद्धी यावर अवलंबून असते, असे श्री रेड्डीने म्हटले आहे.

टॅग्स :Arrestअटक