शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय मुलं ही उपजतच राजकारणी असतात- नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2018 16:15 IST

आई- वडिलांनी नकार दिला तर ते काम आजीकडून कसे करवून घ्यायचे हे त्यांना चांगलेच समजते.

नवी दिल्ली: भारतीय मुलांना जन्मत:च राजकारणाची समज असते, असे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. ते शुक्रवारी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या  'परीक्षा पर चर्चा' या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी देशभरातील विद्यार्थ्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारले. यावेळी मोदींनी विद्यार्थ्यांना परीक्षेच्यावेळी तणावमुक्त कसे राहाल, याबद्दल मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी म्हटले की, एकत्र कुटुंबात राहत असल्याने भारतातील मुले जन्मत:च राजकारणी असतात. आई- वडिलांनी नकार दिला तर ते काम आजीकडून कसे करवून घ्यायचे हे त्यांना चांगलेच समजते. त्यामुळे या ना त्या पद्धतीने ते स्वत:चा कार्यभाग साधतातच, असे मोदींनी सांगताच सभागृहात हशा पिकला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीच्या तालकटोरा स्टेडिअममध्ये 'परीक्षा पर चर्चा' या कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या अनेक प्रश्नांची उत्तरं दिली. मोदींनी विद्यार्थ्यांना परीक्षेच्यावेळी तणावमुक्त कसे राहाल, याबद्दल मार्गदर्शन केले. यावेळी एका अकरावीच्या विद्यार्थ्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींना मजेशीर प्रश्नही विचारला. पुढील वर्षी (2019मध्ये) माझी बोर्डाची परीक्षा आहे आणि पुढील वर्षीच लोकसभेच्या निवडणुका आहेत. त्यासाठी तुमची तयारी कशी सुरू आहे? विद्यार्थ्याच्या या प्रश्नावर नरेंद्र मोदींनी हसून उत्तर दिलं. 'जर मी तुझा गुरू असतो तर तुला पत्रकार बनण्याचा सल्ला दिला असता. कारण पत्रकारच असे प्रश्न फिरवून विचारू शकतात. मोदी म्हणाले, निवडणूक असो वा परीक्षा दोन्ही वेळी वेळेचा पुरेपुर उपयोग करा, तुम्ही शक्ती भरपूर वापरा. परीक्षा वर्षातून एकदाच येते. तुला बोर्डाच्या परीक्षेसाठी शुभेच्छा! माझ्याबरोबर सव्वाशे कोटी लोकांचे आशिर्वाद आहेत. ती माझी खरी ताकद आहे, असे मोदींनी सांगितले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीexamपरीक्षा