शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

'भारतीय सैन्य देशाच्या एक इंचही भूभागावर कोणाचा कब्जा होऊ देणार नाही'

By महेश गलांडे | Updated: October 25, 2020 13:31 IST

लॉकडाऊन म्हणजेच जून महिन्यापासून भारत आणि चीनमधील संबंध ताणले असून गलवान घाटीत भारत आणि चीनच्या जवानांमध्ये हिंसक संघर्ष झाला होता. त्यामध्ये, देशाच्या 20 जवानांना वीरमरण आले.

ठळक मुद्देलॉकडाऊन म्हणजेच जून महिन्यापासून भारत आणि चीनमधील संबंध ताणले असून गलवान घाटीत भारत आणि चीनच्या जवानांमध्ये हिंसक संघर्ष झाला होता. त्यामध्ये, देशाच्या 20 जवानांना वीरमरण आले.

कोलकाता - देशाचे संरक्षणमंत्री राजनाथसिंह दे दोन दिवसीय पश्चिम बंगाल दौऱ्यावर आहेत. सिंह यांनी आपल्या दौऱ्याची सुरूवात विजयादशमी दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर दार्जिलिंगमधील सुकना युद्ध स्मारक येथून केली. येथील स्मारकाला अभिवादन केल्यानंतर, सिंह यांनी शस्त्रांची पूजा केली. यावेळी बोलताना भारत आणि चीन सीमारेषेवरील तणावावर त्यांनी भाष्य केलं, लडाख सीमारेषेवर शांतता असावी आणि तणाव संपुष्टात यावा, अशी इच्छा सिंह यांनी व्यक्त केली. 

लॉकडाऊन म्हणजेच जून महिन्यापासून भारत आणि चीनमधील संबंध ताणले असून गलवान घाटीत भारत आणि चीनच्या जवानांमध्ये हिंसक संघर्ष झाला होता. त्यामध्ये, देशाच्या 20 जवानांना वीरमरण आले. चीनसोबतच्या या झटापटीच्या संघर्षात भारतानेही चोख प्रत्युत्तर देत चीनच्या जवळपास 40 सैन्यांना ठार केले होते. लडाख सीमारेषेवरील या संघर्षाची धग अद्यापही कायम असून चीनकडून घुसखोरी करण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र, भारतीय सैन्य चीनच्या या कटूनितीला जशास तसे उत्तर देत आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांनीही लडाख सीमारेषेवर जाऊन चीनला ठणकावले होते. तसेच, भारत हा शांतीप्रिय देश असून विस्तारवादाला आपल्याकडे थारा नसल्याचंही मोदींनी म्हटलं होतं.    संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनीही सुकना युद्ध स्मारक येथे जवानांना संबोधित करताना, त्यांच्या वीरतेचं आणि धाडसाचं कौतुक केलंय. भारत आणि चीन या दोन्ही देशात शांतीपूर्ण संबंध असावेत, सीमारेषेवर शांतता रहावी आणि तेथील तणाव संपुष्टात यावा, अशी इच्छा सिंह यांनी व्यक्त केली. मात्र, भारत देशाचं सैन्य आपल्या जमिनीच्या एक इंचही भूभागावर कोणाला कब्जा करु देणार नाही, याची खात्रीही त्यांनी देशवासीयांना दिली. राजनाथसिंह हे पश्चिम बंगाल आणि सिक्कीमच्या दोन दिवसीय दौऱ्यावर असून तेथील युद्ध स्मारक व सैन्य दलाच्या भेटी घेत आहेत. सुकना युद्ध स्मारक येथे जाऊन राजनाथसिंह यांनी शहीदांना आदरांजली अर्पण केली, तसेच सैनिकांचे बलिदान कधीही विसरता येणार नसल्याचे म्हटले. 

दरम्यान, दार्जिलिंग दौऱ्यात सिंह यांनी सीमा कडक संघटना (बीआरओ) द्वारे उभारण्यात आलेल्या गंगटोक-नाथुला रोडचे उद्घाटन केले, सिक्कीममध्ये 65 किमीच्या रस्ते निर्मित्तीचं काम प्रगतीपथावर असल्याचंही सिंह यांनी म्हटलं.  

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानRajnath Singhराजनाथ सिंहchinaचीनsikkimसिक्किम