शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

हिममानवाच्या अस्तित्वाच्या 'पाऊल'खुणा? लष्करानं प्रसिद्ध केलेल्या फोटोंमुळे चर्चेला उधाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2019 07:43 IST

मकालू बेस कॅम्पजवळ आढळले पायांचे मोठे ठसे

नवी दिल्ली : हिममानव प्रत्यक्षात आहे की नाही, याबद्दल अनेकदा चर्चा होते. महाकाय हिममानवाचं वर्णन तुम्ही अनेकदा पुस्तकात वाचलंदेखील असेल. मात्र खरंच हिममानव अस्तित्वात आहे का, हा प्रश्न कायम आहे. अशा परिस्थितीत भारतीय लष्कराला मकालू बेस कॅम्पजवळ पायांचे काही ठसे आढळून आले आहेत. या ठशांचा आकार पाहता, खरंच हिममानव अस्तित्वात आहे का, याची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. भारतीय लष्करानं पहिल्यांदाच हिममानव 'येती'च्या अस्तित्वाचं काही फोटो प्रसिद्ध केले आहेत. भारतीय लष्कराच्या ट्विटर अकाऊंटवरुन प्रसिद्ध करण्यात आलेल्या या फोटोंमध्ये महाकाय पायांचे ठसे दिसत आहेत. हे ठसे हिममानव 'येती'च्या पायांचे असू शकतात अशी चर्चा सुरू झाली आहे. 'भारतीय लष्कराच्या एका गिर्यारोहक पथकाला पहिल्यांदाच मकालू बेस कॅम्पजवळ जवळपास 32x15 इंचाचे रहस्यमयी हिममानव येतीच्या पायांचे ठसे सापडले आहेत. हा मायावी हिममानव याआधी केवळ मकालू-बरुन नॅशनल पार्कमध्ये दिसला होता,', असं लष्करानं ट्विटमध्ये म्हटलं आहे. येती आहे तरी कोण?जगातील रहस्यमयी प्राणी असलेल्या येतीची कहाणी जवळपास 100 वर्ष जुनी आहे. अनेकदा हा प्राणी दिसल्याचं वृत्त आलं होतं. लडाखमधल्या बौद्ध मठांमध्ये राहणाऱ्या काहींनी हिममानव येती दिसल्याचा दावा केला आहे. मात्र संशोधनकर्त्यांचं मत काहीसं वेगळं आहे. संशोधनकर्ते येतीला हिममानव मानत नाही. येती हा माणूस नसून तो ध्रुवीय आणि तपकिरी रंगाच्या अस्वलाच्या संकरापासून जन्माला आलेला प्राणी असल्याचं संशोधनकर्ते मानतात. येती हा महाकाय प्राणी असून त्याचा चेहरा माकडासारखा असतो, असा काही वैज्ञानिकांचा दावा आहे. येतीचा चेहरा माकडासारखा असला, तरी तो माणसाप्रमाणे दोन पायांवर चालतो, असंदेखील वैज्ञानिक सांगतात. येतीचे अनेक रोमांचक किस्से सांगितले जातात. मात्र त्याच्याबद्दल वैज्ञानिकांमध्ये एकमत नाही. 

टॅग्स :Indian Armyभारतीय जवान