शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

मोदी सरकार लष्करातून २७ हजार जवानांना कमी करणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2019 10:42 IST

खर्च कमी करण्यासाठी लवकरच मोठा निर्णय घेतला जाण्याची शक्यता

नवी दिल्ली: भारतीय लष्कर २७ हजार जवानांना सेवेतून कमी करण्याची शक्यता आहे. लष्कराशी थेट संबंध नसलेल्या जवानांची सेवा सरकारकडून संपुष्टात आणली जाऊ शकते. यामुळे लष्कराचे जवळपास १६ अब्ज रुपये वाचतील, असा अंदाज आहे. लष्करात सध्या १२.५० लाख जवान कार्यरत आहेत. त्यांच्या वेतन आणि इतर भत्त्यांवर लष्कराला मोठा खर्च करावा लागतो. त्यामुळे लष्कराचं आकारमान कमी करण्याचा विचार सुरू आहे. सध्या लष्कराच्या इंजिनीयर सर्व्हिसेस, नॅशनल कॅडेट कॉर्प्स, बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशन, टेरिटिरियल आर्मी आणि सैनिकी शाळांमध्ये १.७५ अधिकारी आणि जवान कार्यरत आहेत. याशिवाय लष्कराशी थेट संबंधित नसलेले जवान आसाम रायफल्स, राष्ट्रीय रायफल्स आणि स्ट्रॅटर्जिक फोर्सेस कमांडमध्येदेखील कर्तव्य बजावत आहेत. या जवानांचा समावेश कायमस्वरुपी तैनात असलेल्या जवानांमध्ये होत नाही. जवानाच्या संख्येत कपात करण्यात येणार असल्याची शक्यता असल्याचं वृत्त टाईम्स ऑफ इंडियानं दिलं आहे. लष्करातील कपातीबद्दलचा निर्णय घेण्यासाठी मुख्यालयातील महासचिवांच्या (नियोजन) अध्यक्षतेखाली विस्तृत आढावा घेण्यात आला. यामध्ये २७ हजार जवानांच्या कपातीसोबतच कार्यक्षमता आणि उपयोग्यता वाढवण्यासाठी लष्कराची पुनर्रचना करण्याची शिफारसदेखील करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. कंपोजिशन टेबल-२ च्या अंतर्गत येणाऱ्या संस्थांमध्ये सेवा देत असलेल्या जवानांना माघारी बोलवण्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी संरक्षण मंत्रालयाकडे पाठवण्यात आल्याचंदेखील सूत्रांनी सांगितलं. लष्कराला तंत्रसज्ज करुन जवानांची संख्या करण्याचा विचार अतिशय गांभीर्यानं सुरू आहे. येत्या ६-७ वर्षांमध्ये जवळपास १.५ लाख जवानांना सेवेतून कमी केलं जाऊ शकतं. यामुळे दर वर्षाला लष्कराचे ६० ते ७० अब्ज रुपये वाचू शकतील. पुनर्रचना करण्यासाठी लष्करानं गेल्या वर्षी चार वेगवेगळी सर्वेक्षणं केली होती. त्यातील संगठनात्मक सर्वेक्षणातील शिफारसी यंदाच्या वर्षात लागू होणार आहेत. लष्करातील जवानांची संख्या कमी करण्याच्या प्रस्तावाला कधीही मंजुरी मिळू शकते.  

टॅग्स :Indian Armyभारतीय जवान