शहरं
Join us  
Trending Stories
1
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
4
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
5
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
6
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
7
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
8
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
9
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
10
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
11
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
12
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
13
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
15
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
16
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
17
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
18
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
19
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
20
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 

ना पाक काही ऐकू शकणार, ना चीनला डेटा चोरता येणार, भारतीय लष्कराने तयार केली स्वतःची स्वतंत्र ‘संभव’ संपर्क यंत्रणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2024 09:04 IST

भारतीय लष्कराची ही यंत्रणा ५ जी तंत्रज्ञानावर काम करील. लष्कराने या सुरक्षित लष्करी मोबाइल यंत्रणेला ‘संभव’ असे नाव दिले आहे.

नवी दिल्ली : लष्करी दळणवळणासाठी भारतीय लष्कराने स्वतःची स्वतंत्र संपर्क यंत्रणा तयार केली आहे. ही यंत्रणा एवढी सुरक्षित आहे की, ना पाकिस्तान काही ऐकू शकणार आहे, ना चीन त्याचा डेटा चोरू शकणार. ही मोबाइल प्रणाली अनेक स्तरांवर सुरक्षित केली गेली आहे. यामुळे लष्कराचे संपूर्ण संभाषण सुरक्षित राहणार आहे.भारतीय लष्कराची ही यंत्रणा ५ जी तंत्रज्ञानावर काम करील. लष्कराने या सुरक्षित लष्करी मोबाइल यंत्रणेला ‘संभव’ असे नाव दिले आहे. १५ जानेवारीला लष्कर दिनानिमित्त पहिल्या टप्प्यात २५०० सेट लॉन्च केले जाणार आहेत. त्यानंतर टप्प्याटप्प्याने ३५ हजार संच तैनात केले जातील. 

‘ऑपरेशन सर्वशक्ती’ कसे राबविणार?या मोहिमेअंतर्गत जम्मू-काश्मीर केंद्रशासित प्रदेशातील पीर पंजाल पर्वतराजीच्या दोन्ही बाजूंनी लष्कर सक्रिय दहशतवाद्यांना लक्ष्य करील. श्रीनगरस्थित चिनार कॉर्प्स तसेच नगरकोटा-मुख्यालय असलेल्या व्हाइट नाइट कॉर्प्स संयुक्तरीत्या मोहीम राबवतील.जम्मू-काश्मीर पोलिस, सीआरपीएफ, विशेष कृती दल आणि गुप्तचर संस्था जम्मू-काश्मीरमध्ये विशेषतः राजौरी पूंछ सेक्टरमध्ये दहशतवादी कारवायांना पुनरुज्जीवित करण्याच्या पाकिस्तानच्या योजना हाणून पाडण्यासाठी समन्वय साधतील. पाकिस्तानसमर्थित दहशतवादी संघटनांनी दक्षिणेकडील पीर पंजाल पर्वतराजीमध्ये, विशेषतः राजौरी पूंछ सेक्टरमध्ये दहशतवाद पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न केला आहे. 

दहशतवाद्यांचे हल्ले ‘सर्वशक्ती’ करणार फेलजम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या कारवाया वाढवण्याच्या मनसुब्याला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय लष्कराने ‘ऑपरेशन सर्वशक्ती’ सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘ऑपरेशन सर्वशक्ती’ मोहीम ‘सर्पविनाश’च्या धर्तीवर असेल, जी २००३ मध्ये पीर पंजाल पर्वतरांगेच्या दक्षिणेकडील त्याच भागात दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी सुरू करण्यात आली होती.

काय आहे ‘संभव’ प्रणालीची खासियत- भारतीय लष्कराचे संपर्क पूर्णपणे सुरक्षित राहतील.- ही यंत्रणा बहुस्तरीय सुरक्षा प्रणालीअंतर्गत गोपनीयपणे कार्य करील.- ही पूर्णपणे प्रत्यक्ष वेळेनुसार (रिअल टाइम) कार्य करील.- यामुळे लष्कराच्या कारवाया अधिक सक्षम होतील.

आपले सैनिक कुटुंब, जात आणि पंथ याच्यावर उठून फक्त राष्ट्राचा विचार करतात आणि ते त्यांचे कर्तव्य प्रभावीपणे पार पाडतात कारण त्यांना माहीत आहे की, जर राष्ट्र सुरक्षित असेल तर सर्व काही सुरक्षित आहे.      - राजनाथ सिंह, संरक्षणमंत्री

टॅग्स :Indian Armyभारतीय जवान