शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

चीन-पाकला एकत्रितरित्या तोंड देण्यास भारत सज्ज; आता १० ऐवजी १५ दिवसांचा युद्धसाठा ठेवता येणार

By मोरेश्वर येरम | Updated: December 13, 2020 13:49 IST

स्वदेशी आणि परदेशी स्रोतांचा वापर करुन विविध प्रकारचा सुसज्ज शस्त्रसाठा खरेदी केला जाणार आहे. चीन आणि पाकिस्तानच्या आव्हानाचा विचार करुन सरकारने हे पाऊल उचलल्याचं बोललं जात आहे. 

ठळक मुद्देचीनसोबतच्या तणावामुळे भारताचा मोठा निर्णयभारतीय लष्कराला आता १० ऐवजी १५ दिवसांचा युद्धसाठा ठेवता येणार५० हजार कोटींचा शस्त्रसाठा विकत घेणार भारतीय लष्कर

नवी दिल्लीचीनच्या सीमेवरील कुरापती लक्षात घेता भारताने महत्वाचं पाऊल उचललं आहे. भारतीय सुरक्षा दलाला आता लढाईसाठी लागणारा १५ दिवसांचा युद्धसाठा करुन ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. या नव्या अधिकारांमुळे आणि आणीबाणीच्या काळातील खरेदीच्या अधिकारांचा वापर करुन येत्या काही महिन्यांमध्ये भारतीय लष्कर तब्बल ५० हजार कोटी रुपयांचा खर्च करणार आहे. 

स्वदेशी आणि परदेशी स्रोतांचा वापर करुन विविध प्रकारचा सुसज्ज शस्त्रसाठा खरेदी केला जाणार आहे. चीन आणि पाकिस्तानच्या आव्हानाचा विचार करुन सरकारने हे पाऊल उचलल्याचं बोललं जात आहे. 

परकीय शक्तींकडून देशावर हल्ला झाल्यास १० दिवस पुरेल इतका शस्त्रसाठा तयार ठेवण्याची परवानगी सुरक्षा दलांना होती. त्यात वाढ करुन आता १५ दिवसांचा शस्त्रसाठा सुरक्षा दलाला ठेवता येणार आहे. "शत्रू देशासोबत लढाईचा प्रसंग उद्भवल्यास १५ दिवस पुरेल इतका शस्त्रसाठा करण्याची परवानगी देण्यात आली असून त्यासाठी आवश्यक तो शस्त्रसाठा खरेदी केला जाणार आहे", अशी माहिती सरकारी सुत्रांनी एएनआय या वृत्तसंस्थेला दिली आहे. 

चीन आणि पाकिस्तानला एकत्रितरित्या सामोरं जाण्यासाठी भारताची तयारीभारत सध्या चीनच्या सीमेवरील कुरापतींचा सामना करत आहे. तर दुसरीकडे पाकिस्तानकडून सुरू असलेली घुसखोरीही भारतासाठी डोकेदुखी ठरत आहे. तिन्ही सेना दलांचे प्रमुख बिपिन रावत यांनीही याआधी अनेकदा चीन आणि पाकिस्तानसोबत एकत्रितरित्या तोंड द्यावं लागण्याची तयारी करायला हवी असं म्हटलं आहे. चीनसोबतच्या तणावामुळे भारताने अनेक सुरक्षा करार केले आहेत. याशिवाय अनेक स्वदेशी मिसाइलची चाचणी केली जात आहे.  

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानchinaचीनPakistanपाकिस्तान