शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

Indian Air Strike on Pakistan: मसूद अजहरचा मोठा भाऊ ठार; भारतानं जैशचं कंबरडं मोडलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2019 15:50 IST

नियंत्रण रेषा ओलांडून भारतीय हवाई दलानं केलेली कारवाई यशस्वी

नवी दिल्ली: पुलवामातील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतानं केलेली कारवाई अतिशय यशस्वी ठरली आहे. भारतीय हवाई दलानं केलेल्या या कारवाईनं जैश-ए-मोहम्मदचं कंबरडं मोडलं. जैशचा म्होरक्या मौलाना मसूद अजहरचा मोठा भाऊ इब्राहिम अजहरचा या कारवाईत खात्मा झाला आहे. याशिवाय मसूद अजहरचा मेहुणा युसूफ अजहरदेखील या कारवाईत मारला गेला. भारतीय हवाई दलाच्या 12 मिराज 2000 विमानांनी मध्यरात्री नियंत्रण रेषा ओलांडून दहशतवादी तळांवर हल्ले केले. बालाकोट, मुझफ्फराबाद आणि चकोठी भागात हवाई दलानं 1000 किलोंचे बॉम्ब फेकले. यामध्ये जवळपास 300 दहशतवादी मारले गेले आहेत. बालाकोटमध्ये करण्यात आलेला हल्ला सर्वाधिक यशस्वी ठरला. बालाकोट जैशचा सुरक्षित आणि सर्वात मोठा बालेकिल्ला मानला जातो. बालाकोटवर हवाई दलानं अचूक निशाणा साधला. यात मसूद अजहरचा मोठा भाऊ इब्राहिम अजहर ठार झाला. 1999 मध्ये इंडियन एअरलाईन्सचं विमान हायजॅक करण्यात आलं होतं. यातील प्रवाशांची सुटका करण्यासाठी भारताला मौलाना मसहूद अजहरला सोडून द्यावं लागतं होतं.  इंडियन एअरलाईन्सचं विमान हायजॅक करण्यात इब्राहिम अजहरची महत्त्वपूर्ण भूमिका होती. 

भारतीय हवाई दलाच्या कारवाईनं जैशला मोठा धक्का दिला आहे. मौलाना मसूद अजहरचा मेहुणा युसूफ अजहरदेखील या कारवाईत ठार झाला आहे. याशिवाय ऑपरेशन हेड मुफ्ती अजहरदेखील भारताच्या एअर स्ट्राइकमध्ये मारला गेला. बालाकोट नियंत्रण रेषेपासून जवळपास 40 किलोमीटर दूर आहे. त्यामुळे या भागात हल्ला होईल, याची कल्पना जैशनं केली नव्हती. 2016 मध्ये उरीचा बदला घेण्यासाठी भारतीय लष्करानं पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राइक केला होता. त्यामुळे यावेळी पुलवामातील हल्ल्यानंतर पाकिस्ताननं नियंत्रण रेषेजवळील दहशतवाद्यांचे तळ तातडीनं हलवले होते. त्यामुळे भारतीय हवाई दलानं थेट सीमा ओलांडून 40 किलोमीटरपर्यंत जाऊन बॉम्बफेक केली आणि जैशला धडा शिकवला.

टॅग्स :Indian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकindian air forceभारतीय हवाई दलterroristदहशतवादीPakistanपाकिस्तानJaish e Mohammadजैश-ए-मोहम्मद