शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

Indian Air Strike on Pakistan: जिगरबाज लष्करानं शेअर केलेली 'ही' कविता वाचूनही वीरांना कराल सलाम!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2019 13:53 IST

एअर स्ट्राईकची माहिती मिळाल्यानंतर भारतीय लष्कराच्या अधिकृत ट्वीटर हॅण्डलवरून एक कविता प्रसिद्ध करण्यात आली आहे. 

ठळक मुद्देएअर स्ट्राईकची माहिती मिळाल्यानंतर भारतीय लष्कराच्या अधिकृत ट्वीटर हॅण्डलवरून एक कविता प्रसिद्ध करण्यात आली आहे. ट्वीटमध्ये बंदूक रोखलेल्या एका भारतीय जवानाचा फोटोही पोस्ट करण्यात आला आहे.#IndianArmy आणि #NationFirst हे हॅशटॅग वापरण्यात आले आहेत.

नवी दिल्ली - भारताने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून तेथील दहशतवादी तळांवर  एअर सर्जिकल स्ट्राईक केला आहे. या हल्ल्यात पाकिस्तानच्या बालाकोट येथील बहुतांशी दहशवादी तळ उद्धवस्त करण्यात आले आहेत. पाकव्याप्त काश्मीरमध्ये हवाई हल्ला करून, जैश-ए-मोहम्मदच्या तळांवर बॉम्बवर्षाव करून भारतीय वायुसनेनं आज पुलवामा हल्ल्याचा बदला घेतला आहे. भारतीय लष्कराच्या या धडाकेबाज कारवाईचं सर्वच स्तरांतून कौतुक होतं आहे.

एअर स्ट्राईकची माहिती मिळाल्यानंतर भारतीय लष्कराच्या अधिकृत ट्वीटर हॅण्डलवरून एक कविता प्रसिद्ध करण्यात आली आहे. ट्वीटमध्ये बंदूक रोखलेल्या एका भारतीय जवानाचा फोटोही पोस्ट करण्यात आला आहे. तसेच #IndianArmy आणि #NationFirst हे हॅशटॅग वापरण्यात आले आहेत. भारतीय लष्कराने प्रसिद्ध कवी रामधारी सिंह यांच्या कवितेमधील काही ओळी ट्वीट केल्या आहेत. 

‘क्षमाशील हो रिपु-समक्षतुम हुए विनीत जितना ही,दुष्ट कौरवों ने तुमकोकायर समझा उतना ही।

सच पूछो, तो शर में हीबसती है दीप्ति विनय की,सन्धि-वचन संपूज्य उसी का जिसमें शक्ति विजय की।’

14 फेब्रुवारीला जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे 'जैश-ए-मोहम्मद'नं सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला केला होता. त्यात 40 जवान शहीद झाले होते. या हल्ल्याचा बदला घेण्याची, सर्जिकल स्ट्राइक-2 करण्याची तीव्र भावना देशभरातून व्यक्त होत होती. ही इच्छा आज वायुसेनेने पूर्ण केली आहे. 'मिराज 2000' या हायटेक लढाऊ विमानांमधून भारतानं 1000 किलोचे बॉम्ब 'जैश'च्या तळांवर पाडले. त्यात 300 दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याचं समजतं.

भारतीय वायू सेनेकडून पाकिस्तानमध्ये घुसून तेथील दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक करण्यात आला. या हल्ल्याच्या वृत्ताला भारत सरकारकडूनही दुजोरा देण्यात आला आहे. त्यानंतर, काही तासांतच गुजरातमधील कच्छ प्रांतात पाकिस्तानचे एक ड्रोन फिरताना आढळून आले. मात्र, भारताकडून पाकचे हे ड्रोनही नेस्तनाबूत करण्यात आले आहे. भारताने केलेल्या एअर स्ट्राईकनंतर दोन्ही देशांमधील सीमा भागांवर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Indian Air Strike on Pakistan: भारतीय वायुसेनेची चलाखी; पाकिस्तानला 'असा' दिला चकवा!

दहशवाद्यांवर कारवाई करताना भारतीय वायुसेनेने पाकिस्तानला मोठा चकवा दिला आहे. भारतीय वायु सेनेच्या 'मिराज 2000' च्या 12 लढाऊ विमानांची हा हल्ला केला. मात्र, पाकिस्तानला हल्ला करण्यात येणार आहे, याचा सुगावा लागू नये म्हणून भारतीय वायु सेनेने देशातील 20 विमानतळांवरून 'मिराज'च्या  विमानांचे उड्डाण केले. या मध्ये ग्वाल्हेर, भटिंडा, अंबाला या विमानतळांचा समावेश आहे. 

भारतीय वायू सेनेकडून मध्यरात्री 3.30 वाजता बालाकोट येथील दहशतवादी तळांवर मिराज आणि सुखोई या विमानांच्या सहाय्याने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यानंतर दोन्ही उभय देशांमध्ये वेगवाग घडामोडी सुरू आहेत. पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री मेहमूद कुरेशी यांनी तातडीची बैठक बोलावून या हल्ल्यासंदर्भात चर्चा सुरू केली आहे. तर, भारताचे परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनीही या हल्ल्यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. भारताने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून का आणि कुठे हल्ला केला, याची माहिती गोखले यांनी दिली. पाकिस्तानमधील संघटना जैश ए मोहमद हे भारतीय सैन्यावर आणखी हल्ले करण्याच्या तयारीत होते. तत्पूर्वीच भारतीय सैन्याने हल्ला घडवून त्यांच कंबरड मोडलं आहे. या हल्ल्यात जैश ए मोहम्मद दहशतवादी संघटनेचे अनेक दहशतवादी, कमांडर, ट्रेनी दहशतवाद्यांचा खात्मा झाला आहे. मात्र, या हल्ल्यात नागरिकांना कुठलाही त्रास झाला नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :Indian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकindian air forceभारतीय हवाई दलPakistanपाकिस्तानIndian Armyभारतीय जवान