शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवार यांना 'दादा'गिरी अंगलट; आधी फोनवरून झापलं, नंतर दिलं स्पष्टीकरण
2
Mumbai: १४ पाकिस्तानी ४०० किलो आरडीएक्ससह देशात घुसले
3
बाप्पाच्या निरोपाला वरुणराजाही, विसर्जन निर्विघ्न पार पाडण्यासाठी पालिका, पोलिसांकडून नियोजन
4
ganesh visarjan 2025: बाप्पाच्या निरोपाचे एआयद्वारे ट्रॅकिंग, ड्रोनने सूचना; २५ हजार पोलिस सज्ज
5
महापालिकेची पूर्वतयारी परीपूर्ण, राज्य निवडणूक आयुक्त आढाव्यानंतर समाधानी
6
Vanraj Andekar: वनराज आंदेकर टोळीने रक्तरंजित बदला घेतला; नाना पेठेत गोळीबार, आयुष कोमकरचा खून
7
भारत माफी मागेल, चर्चेच्या टेबलवर वाटाघाटीला येईल; डोनाल्ड ट्रम्प यांचे सचिव बरळले, धमकीही दिली
8
तंबाखू, सिगारेट अन्..., आणखी महागणार; केवळ ४०% जीएसटीच नव्हे, अतिरिक्त टॅक्सही लागणार?
9
अभिनेते आशिष वारंग यांचे आकस्मिक निधन; मराठी, बॉलिवूड चित्रपट सृष्टीवर शोककळा
10
टियागो ७५००० रुपये, नेक्सॉन, हॅरिअर, सफारी खूपच स्वस्त झाली; टाटाने जीएसटी कपातीचे दर जाहीर केले
11
Bhagwant Mann: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची प्रकृती बिघडली; हॉस्पिटलमध्ये भरती केले
12
"ब्राह्मण नफा कमावतायेत...!"; ट्रम्प यांच्या सल्लागाराच्या विधानावर भारताचा जोरदार पलटवार, दिलं असं उत्तर!
13
धक्कादायक! अफगाणिस्तानमधील भूकंपामध्ये महिलांना कोण वाचवत नाहीत, तालिबानच्या कायद्यांमुळे बचावकार्यात अडथळे
14
चीन की पाकिस्तान, भारतासाठी सर्वात मोठा धोका कोण? सीडीएस अनिल चौहान यांनी स्पष्ट सांगितले
15
यांचे काहीतरी वेगळेच...! Vivo, सॅमसंग नाही, पाकिस्तानात चालतो हा मोबाईल ब्रँड; ऐकलाही नसेल...
16
'आम्ही रशियाकडून तेल खरेदी करत राहू'; केंद्रीय अर्थमंत्र्याचे मोठे विधान
17
"माझा उद्देश हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर...", अजित पवारांनी सोडले मौन; IPS अंजली कृष्णा, व्हायरल व्हिडीओवर काय बोलले?
18
हुआवेचा आणखी एक ट्रिपल फोल्डेबल फोन लॉन्च; सॅमसंग, शाओमी, विवो, ओप्पोची उडाली झोप!
19
प्रसिद्ध फुटबॉलपटू नेमारही अज्ञात होता...! अनोळखी अब्जाधीश १० हजार कोटींची संपत्ती सोडून गेला
20
चांदीच चांदी...! वॅगनआरवर 84 हजार, नेक्सॉनवर 1.55 लाखांपर्यंत जीएसटी कमी होणार; अल्टो, 3XO किंमती पहाल तर...

शत्रुंची खैर नाही! भारतीय वायुदल खरेदी करणार ११४ लढाऊ विमाने, १.५ लाख कोटी रुपयांचा सौदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2022 07:00 IST

आत्मनिर्भर भारत अभियानाला चालना देण्यासाठी  भारतीय वायुदलाची आपल्या ताफ्यात  ११४ लढाऊ विमाने सामील करण्याची योजना आहे.

नवी दिल्ली :

आत्मनिर्भर भारत अभियानाला चालना देण्यासाठी  भारतीय वायुदलाची आपल्या ताफ्यात  ११४ लढाऊ विमाने सामील करण्याची योजना आहे.  विशेष म्हणजे, यापैकी ९६ विमानांची निर्मिती भारतातच केली जाणार आहे.  बाकी १८ लढाऊ विमाने या प्रकल्पासाठी निवड करण्यात  आलेल्या  विदेशी विक्रेत्यांकडून खरेदी केली जातील.मल्टिरोल फायटर एअरक्राफ्टची (एमआरएफए) खरेदी ‘बाय ग्लोबल अँड मेक इन इंडिया’ योजनेंतर्गत खरेदी केली जाणार असून, भारतीय कंपन्यांना विदेशी विक्रेत्याशी भागीदारी करण्याची मुभा असेल. सरकारी सूत्रांनुसार अलीकडेच भारतीय वायुदलाने विदेशी विक्रेत्यांची बैठक घेऊन  त्यांना ‘मेक इन इंडिया’ प्रकल्पातंर्गत या योजनेला स्वरूप देण्याच्या पद्धतीबाबत  विचारणा करण्यात आली होती. वायुदलाने अगोदरच ८३ एलसीए एमके-१-ए विमाने खरेदीसाठी मागणी नोंदविली; परंतु या विमानांची मोठ्या प्रमाणांवर गरज आहे. कारण वायुदलाच्या ताफ्यातील मिग श्रेणीतील विमाने टप्प्याटप्प्याने हटविली जात आहेत किंवा ही विमाने शेवटची घटका मोजत आहेत. लढाऊ विमानांची गरज पूर्ण करण्यासाठी कमी खर्च लागेल, असा तोडगा वायुदल शोधत आहे. संचालन खर्च कमी आणि सेवा देण्याच्या दृष्टीने अधिक सक्षम असलेली विमाने हवी आहेत. राफेल विमानाच्या संचालन क्षमतेबाबत वायुदल समाधानी आहे. भविष्यात आपल्या विमानांकडूनही अशी सेवा अपेक्षित आहे.

६० टक्क्यांपेक्षा जास्त स्वदेशी सामग्री0 पहिली १८ विमाने आयात करण्यात आल्यानंतर ३८ लढाऊ विमानांची निर्मिती भारतातच केली जाईल. या लढाऊ विमानांची किंमत विदेशी आणि भारतीय चलनात चुकती केली जाईल. 0 उर्वरित ६० लढाऊ विमानांची जबाबदारी भारतीय भागीदाराची असेल. त्यासाठी सरकार फक्त भारतीय चलनात किंमत चुकती करील. यामुळे या प्रकल्पात सामील होणाऱ्या विक्रेत्याला ६० टक्क्यांपेक्षा जास्त ‘मेक इन इंडिया’ सामग्री मिळविण्यास मदत होईल.राफेलमुळे झाली माेठी मदतभारतीय वायुदलाला शेजारच्या प्रतिस्पर्धी पाकिस्तान आणि चीनवर प्राबल्य राखण्यासाठी या ११४ लढाऊ विमानांवर अवलंबून राहावे लागते. २०२० मध्ये लडाख संकटादरम्यान तातडीच्या आदेशानुसार खरेदी केलेल्या ३६ राफेल विमानांमुळे चीनवर वर्चस्व राखण्यात मोठी मदत झाली होती; परंतु त्यांची संख्या पुरेशी नसल्याने अशा विमानांची जास्त खरेदी करणे जरूरी आहे. 

बोइंग, लॉकहीड, मिग, साब, इरकुत कॉर्पोरेशन आणि डसॉल्ट एव्हिएशनसह जगातील अग्रणी विमाननिर्मिती कंपन्या या निविदेत सामील होण्याची अपेक्षा आहे.

टॅग्स :indian air forceभारतीय हवाई दल