शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

वायुसेनेला सलाम... बालकोटचं शौर्य आणि 'अभिनंदनीय' पराक्रमाचा व्हिडीओ प्रसिद्ध!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2019 13:36 IST

हवाई दल प्रमुखांकडून एअर स्ट्राइकचा व्हिडीओ प्रसिद्ध

नवी दिल्ली: पुलवामातील दहशतवादी हल्ल्याचा बदला म्हणून करण्यात आलेल्या एअर स्ट्राइकचा प्रमोशनल व्हिडीओ भारतीय हवाई दलानं प्रसिद्ध केला आहे. हवाई दल प्रमुख आर. के. एस. भदोरिया यांनी हवाई दल दिनाच्या निमित्तानं बालाकोटवरील कारवाईचा व्हिडीओ जारी केला. फेब्रुवारी महिन्यात भारतीय हवाई दलानं पाकिस्तानच्या बालाकोटमधील दहशतवादी हवाई तळ उद्ध्वस्त केले होते.हवाई दलानं प्रसिद्ध केलेल्या व्हिडीओमध्ये आकाशाकडे झेपावणारी हवाई दलाची लढाऊ विमानं, त्यांनी केलेली बॉम्बफेक, त्यामुळे उद्ध्वस्त झालेले दहशतवादी तळ अशी दृश्यं दिसत आहेत. मात्र भारतीय हवाई दलानं हा व्हिडीओ प्रमोशनल म्हणून प्रसिद्ध केल्यानं व्हिडीओतील दृश्यं प्रत्यक्ष बालाकोट एअर स्ट्राइकचीच आहेत की प्रतिमात्मक स्वरुपात हा व्हिडीओ तयार करण्यात आला आहे, असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.  भारतीय हवाई दलानं प्रसिद्ध केलेल्या व्हिडीओमध्ये पुलवामा हल्ल्याचा बदला घेतल्याची माहिती व्हॉईस ओव्हरमधून देण्यात आली आहे. हवाई दलानं प्रसिद्ध केलेल्या व्हिडीओत पुलवामातील हल्ल्यानंतर देशभरात निर्माण झालेला आक्रोश, पाकिस्तानला धडा शिकवण्याची होत असलेली मागणी, त्यानंतर  हवाई दलानं आखलेली हल्ल्याची योजना, वैमानिकांना देण्यात आलेल्या सूचना, विमानातील रडारवर दिसलेले दहशतवादी तळ, त्यावर विमानातून झालेली बॉम्बफेक दिसत आहे. एअर स्ट्राईक झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पाकिस्तानी हवाई दलानं भारतीय हद्दीत घुसखोरी करुन हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. पाकिस्तानी हवाई दलाच्या फसलेल्या प्रयत्नाचा उल्लेखदेखील प्रमोशनल व्हिडीओत आहे. पाकिस्तानचा डाव भारतीय हवाई दलाच्या शूर वैमानिकांनी हाणून पाडत त्यांना माघार घ्यायला लावली, अशी माहिती व्हिडीओत आहे.