शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

VIDEO: भारतीय हवाई दलाचा चित्तथरारक युद्धसराव, "कोणत्याही परिस्थितीला सामोरं जाण्यास तयार"

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2019 21:05 IST

पुलवामा हल्ल्याच्या दोन दिवसानंतरच आज भारतीय हवाई दलानं भारत-पाक नियंत्रण रेषेजवळील जैसलमेरच्या पोखरणमध्ये युद्धसराव केला.

नवी दिल्ली- पुलवामा हल्ल्याच्या दोन दिवसानंतरच आज भारतीय हवाई दलानं भारत-पाक नियंत्रण रेषेजवळील जैसलमेरच्या पोखरणमध्ये युद्धसराव केला. पोखरण रेंजमध्ये करण्यात आलेल्या हा भारतीय हवाई दलाचा देशातील सर्वात मोठा युद्धाभ्यास आहे. या युद्धाभ्यासात 130 लढाऊ विमानं आणि हेलिकॉप्टर, अॅडव्हान्स लाइट हेलिकॉप्टरचा समावेश होता. वायुशक्ती 2019या कार्यक्रमांतर्गत हे शक्तिप्रदर्शन करण्यात आलं आहे. सरकारच्या आदेशाचे पालन करत कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी आम्ही सक्षम असल्याचं हवाई दलाचे प्रमुख बीएस धनोआ यांनी सांगितलं आहे.हवाई दल कोणत्याही परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी तयार असल्याचंही हवाई दलप्रमुख म्हणाले आहेत. विशेष म्हणजे या युद्धसरावादरम्यान क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरही तिथे उपस्थित होता. हवेतून जमिनीपर्यंत मारा करणाऱ्या विमानांची ताकद यावेळी निदर्शनास आली. या युद्धाभ्यासात सुखोई-30, मिग-29, मिराज-2000, जग्वार, मिग-27 सारख्या अत्याधुनिक लढाऊ विमानांचा समावेश होता. तसेच स्वदेशी बनावटीचं तेजस आणि अत्याधुनिक यंत्रणांनी सुसज्ज असलेलं रुद्र या हेलिकॉप्टरनंही हवेत गोळीबार करून शक्तिप्रदर्शन केलं. सिक्युरिटी द नेशन इन पीस अँड वॉर थीमहवाई दलाचा हा कार्यक्रम दर तीन वर्षांनी आयोजित केला जातो. यावेळी हवाई दलानं 'वायु शक्ती 2019' या कार्यक्रमांतर्गत युद्धसराव केला. हवाई दलानं मिग -21 बायसन, मिग-27 यूपीजी, मिग- 29, जग्वार, एलसीए(तेजस), मिराज-2000, सू-30 एमकेआई, हॉक, सी-130 जे सुपर हर्क्युलस, एन-32, एमआय-17वी5, एमआय-35 ही विमानं युद्धसरावात उतरवली होती. स्वदेशी बनावटीचं AEW & C आणि उन्नत लाइट हेलिकॉप्टर (ALH MK-IV)विमानांनी युद्धसराव केला. 

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाairforceहवाईदल