शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

भारत 1962 च्या युद्धातील चूक पुन्हा करणार नाही, चीनला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2017 08:42 IST

केंद्रीय संरक्षणमंत्री अरुण जेटली यांनी राज्यसभेत बोलताना सांगितलं की, भारताने 1962 च्या युद्धामधून शिकवण घेतली आहे आणि लष्कर कोणत्याही परिस्थितीशी दोन हात करण्यास सक्षम आहे

ठळक मुद्देचीनच्या सरकारी वृत्तपत्राने पंतप्रधान मोदींना पंडित जवाहरलाल नेहरु यांनी 1962 मध्ये केलेली चूक पुन्हा न करण्याचा सल्ला दिला होताडोकलाममधून भारताने माघार घेतली नाही तर नंतर स्वत:ला दोष देण्याखेरिज दुसरा कोणताच पर्याय त्यांच्याकडे उपलब्ध नसेल - चीनकेंद्रीय संरक्षणमंत्री अरुण जेटली यांनी भारतीय सशस्त्र सेना देशाच्या सुरक्षेसाठी कोणत्याही आव्हानांना सामोरं जाण्यास पुर्णपणे सज्ज आहे असं सांगितलं आहे

नवी दिल्ली, दि. 10 - डोकलाम मुद्द्यावरुन भारत आणि चीनमध्ये सुरु असलेला वाद अजूनही कायम असून चीनची युद्धाची धमकी देण्याची खोड काही केल्या जाताना दिसत नाही आहे. मंगळवारी चीनच्या सरकारी वृत्तपत्राने पंतप्रधान मोदींना पंडित जवाहरलाल नेहरु यांनी 1962 मध्ये केलेली चूक पुन्हा न करण्याचा सल्ला दिला होता. तर बुधवारी युद्धाचं काऊंटडाऊन सुरु झालं आहे अशी चेतावणीही दिली होती. इकडे केंद्रीय संरक्षणमंत्री अरुण जेटली यांनी बुधवारी राज्यसभेत बोलताना सांगितलं की, भारताने 1962 च्या युद्धामधून शिकवण घेतली आहे आणि लष्कर कोणत्याही परिस्थितीशी दोन हात करण्यास सक्षम आहे. अरुण जेटली यांनी आपल्या बोलण्यात डोकलामचा उल्लेख केला नसला, तरी चीनकडून येणा-या धमक्यांच्या पार्श्वभुमीवर त्यांचं हे वक्तव्य महत्वाचं मानलं जात आहे. 

तर स्वत:ला दोष देईल भारत चीनी वृत्तपत्राने आपल्या संपादकीयमध्ये लिहिलं आहे की, डोकलाममधून भारताने माघार घेतली नाही तर नंतर स्वत:ला दोष देण्याखेरिज दुसरा कोणताच पर्याय त्यांच्याकडे उपलब्ध नसेल. 'दोन्ही देशांमधील लष्करामध्ये युद्दाचं काऊंटडाऊन सुरु झालं आहे. कोणताही मार्ग काढण्यास जागा नसेल अशी वाटचाल सध्या सुरु आहे. वाद सुरु होऊन सात आठवडे होत आहेत, आणि शांतता प्रस्थापित करण्याचे सर्व मार्गही बंद होताना दिसत आहेत', असंही संपादकीयमध्ये लिहिण्यात आलं आहे. 

भारताला वारंवार समज देऊनही त्याकडे दुर्लक्ष केलं जात असल्याचंही वृत्तपत्रात लिहिण्यात आलं आहे. 'ज्यांच्याकडे ऐकण्यासाठी कान आणि पाहण्यासाठी डोळे आहेत त्यांच्याकडे हा संदेश पोहोचायला हवा होता. पण भारत शुद्धीत येण्यास नकार देत आहे, आणि आपलं सैन्यही मागे हटवत नाही आहे', असंही लिहिलं गेलं आहे. 

'1962 मधून घेतला धडा'चीनकडून सतत मिळणा-या युद्धाची धमकी मिळत असताना दरम्यान केंद्रीय संरक्षणमंत्री अरुण जेटली यांनी भारतीय सशस्त्र सेना देशाच्या सुरक्षेसाठी कोणत्याही आव्हानांना सामोरं जाण्यास पुर्णपणे सज्ज आहे असं सांगितलं आहे. यावेळी त्यांनी आपण 1962 च्या युद्धातून धडा घेतला असल्याचा उल्लेखही केला. 

'सैनिकांवर पुर्ण विश्वास'त्यांनी सांगितलं की 'सशस्त्र सेनेला अजून सक्षम बनवण्याची गरज असल्याचा धडा भारतने चीनसोबत झालेल्या 1962 मधील युद्धातून घेतला आहे'. पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, 'काही आव्हानं आजही आपल्यासमोर उभी आहेत याच्याशी मी सहमत आहे. काही लोकांची आपल्या सार्वभौमत्व आणि एकाग्रतेवर नजर आहे. मात्र आपणे वीर जवान देशाला सुरक्षित ठेवण्यामध्ये सक्षम आहेत यावर पुर्ण विश्वास आहे. मग येणारं आव्हान पुर्वेकडून येणार असो अथवा पश्चिमेकडून'. 

याआधीही चीनने भारताला धमकी देताना डोकलाममधून माघार न घेतल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी दिली होती. डोकलाम आपला परिसर असल्याचा दावा चीन करत आहे. दोन्ही सैन्यांनी एकत्र माघार घ्यावी असा सल्ला भारताने चीनला दिला आहे. हा परिसर भूटानचा आहे असं भारताने सांगितलं आहे. मात्र चीन हे ऐकण्यास तयार नाही.