शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

चीन जोवर सैनिकांची संख्या कमी करणार नाही, तोवर भारतही करणार नाही; संरक्षणमंत्र्यांचं रोखठोक उत्तर

By जयदीप दाभोळकर | Updated: January 23, 2021 10:20 IST

चीननं भारताचा विश्वास तोडला यात शंका नाही, राजनाथ सिंह यांचं वक्तव्य

ठळक मुद्देचीननं भारताचा विश्वास तोडला यात शंका नाही, राजनाथ सिंह यांचं वक्तव्यचर्चेतून तोडगा निघण्याचा सिंह यांचा विश्वास

जोवर चीन सीमेवर आपल्या सैनिकांची संख्या कमी करणार नाही तोवर भारतही आपल्या सैनिकांची संख्या कमी करणार नाही, असं रोखठोक उत्तर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिलं. यावेळी त्यांनी भारत-चीनदरम्यान असलेल्या वादावर चर्चेतून तोडगा काढता येऊ शकतो असा विश्वासही व्यक्त केला. भारत आपल्या सीमाक्षेत्रात तेजीनं पायाभूत सुविधांचा विकास करत आहे आणि चीननं काही योजनांवर आक्षेपही घेतला असल्याचं सिंह म्हणाले. "जोवर चीन आपल्या सैनिकांची संख्या कमी करत नाही. तोवर भारतही आपल्या सैनिकांची संख्या कमी करण्याची प्रक्रिया सुरू करणार नाही," असं राजनाथ सिंह म्हणाले. त्यांनी एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत यावर भाष्य केलं. "सध्या सुरू असलेल्या समस्यांचा तोडगा काढण्यासाठी कोणती वेळेची मर्यादा ठरवण्यात आलेली नाही, यासाठी तुम्ही वेळेची मर्यादा ठरवू शकत नाही. आम्हाला चर्चेच्या माध्यमातून यावर तोडगा निघण्याची अपेक्षा आहे," असंही ते म्हणाले. यावेळी त्यांनी अरूणाचल प्रदेशात चीननं गाव वसवल्याच्या वृत्तावरही भाष्य केलं. "हा परिसर सीमेच्या अतिशय जवळ आहे आणि या ठिकाणी पायाभूत सुविधा अनेक वर्षांच्या कालावधीत विकसित करण्यात आल्या आहेत," असंही ते म्हणाले. भारत आणि चीन या देशांदरम्यान द्विपक्षीय संबंध गेल्या चार दशकांच्या किमान स्तरावर आहेत आणि चीननं भारताच्या विश्वासाला तडा दिला आहे का असा प्रश्न राजनाथ सिंह यांना विचारण्यात आला. "चीननं भारताचा विश्वास तोडला आहे यात कोणतीही शंका नाही," असं उत्तर सिंह यांनी यावेळी दिलं. यावेळी त्यांनी सैन्य स्तरावर चर्चेच्या पुढील फेरीता संदर्भ देताना चीननं अलिकडेच १९ जानेवारी रोजीचा चर्चेचा प्रस्ताव ठेवला असल्याचं सांगितलं. "चर्चेच्या एका दिवसांपूर्वीच आम्हाला याची माहिती मिळाली होती. म्हणूनच आम्ही ही चर्चेची फेरी २३ किंवा २४ जानेवारी रोजी पुन्हा निश्चित करण्यास सांगितलं. भारत कायमच चर्चेसाठी तयार असतो," असंही सिंह म्हणाले.

टॅग्स :Defenceसंरक्षण विभागRajnath Singhराजनाथ सिंहchinaचीनBorderसीमारेषाinterviewमुलाखत