जगभरात सध्या अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफची चर्चा सुरू आहे. ट्रम्प यांनी भारतावर रशियातून तेल आयात करण्याच्या मुद्द्यावरून तब्बल ५० टक्के टॅरिफ लादला असून, याबद्दल केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी सरकारची भूमिका मांडली. आत्मनिर्भरतेवर जोर देत त्यांनी भारत आता कोणाच्याही दबावासमोर झुकणार नाही, असे ते म्हणाले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
'भारत आजघडीला ६.५ टक्के विकासदराने पुढे जात आहे. भारत एक मजबूत आणि आत्मविश्वास असलेला देश आहे. जगात आता देश आपआपला व्यापार आणि व्यापारी भागीदार नव्याने ठरवत आहेत. केंद्र सरकारने आता व्यापारात येत असलेले अडथळा दूर करण्यासाठी आधीच पावले उचलली आहेत", असे पीयुष गोयल म्हणाले.
गोयल म्हणाले, "या वर्षात भारताची निर्यात गेल्यावर्षीच्या तुलनेत जास्त असेल. भारत आज जागतिक विकास क्रमवारीत १६ टक्क्यांचा वाटा उचलत आहे. आता भारताला फक्त टॅरिफमधून सवलत नकोय, तर गुंतवणूक आणि रोजगार निर्मितीवरही भर द्यायचा आहे."
"युरोपीय युनियनमधील देशांसोबत चर्चा करताना त्यांनी सांगितले की आपण चार ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था आहात आणि जगातील सर्वात वेगाने वाढत असलेली अर्थव्यवस्था आहात. भारतात सर्वाधिक तरुण आहेत आणि इतर देशात वृद्धांची संख्या वाढू लागली आहे", असेही गोयल यांनी सांगितले.