शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: आता देशांतर्गत विमान उड्डाणंही बंद; कोरोनाला रोखण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2020 18:23 IST

Coronavirus कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय; उद्या रात्रीपासून अंमलबजावणी

नवी दिल्ली: कोरोना विषाणूचा वाढता धोका लक्षात घेऊन केंद्र सरकारनं देशांतर्गत हवाई वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतलाय. मंगळवारी (उद्या) रात्री १२ वाजल्यापासून देशातील हवाई उड्डाणं बंद होतील. त्यामुळे उद्या रात्री १२ च्या आधी विमानं विमानतळांवर उतरतील, अशा प्रकारची योजना विमान कंपन्यांना आखावी लागेल. सरकारनं याआधीच रेल्वे वाहतूक रद्द करण्याचा निर्णय घेतलाय. कोरोनाचा संसर्ग टाळण्याच्या उद्देशानं केंद्र सरकारनं हे महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. देशात दररोज जवळपास ६५०० विमानांची उड्डाणं होतात. ही उड्डाणं देशांतर्गत स्वरुपाची असतात. यामधून वर्षाकाठी १४४.१७ मिलियन प्रवासी प्रवास करतात. मात्र आता कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता देशांतर्गत हवाई उड्डाणं रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. देशात आतापर्यंत कोरोनाचे चारशेहून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या २४ तासांमध्ये कोरोनाग्रस्तांचा आकडा ५० नं वाढलाय. दिल्ली, राजस्थान, बिहार, पंजाब, उत्तराखंड, छत्तीसगड, झारखंड, जम्मू-काश्मीर, तेलंगणा, आंध्र प्रदेश, नागालँड, अरुणाचल प्रदेशमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ३१ मार्चपर्यंत लॉकडाऊन करण्यात आलंय. तर उत्तर प्रदेशमधल्या १६ जिल्ह्यांमध्ये २५ मार्चपर्यंत लॉकडाऊन करण्यात आलंय. महाराष्ट्रातही जमावबंदीपाठोपाठ संचारबंदी लागू करण्यात आलीय. देशातील प्रवासी रेल्वे सेवा पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय कालच मोदी सरकारनं घेतला. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी ३१ मार्चपर्यंतच्या सर्व प्रवासी गाड्या रेल्वे मंत्रालयानं रद्द केल्या आहेत. त्यामुळे एक्स्प्रेस, पॅसेंजर, इंटरसिटी अशा सर्व गाड्या बंद आहेत. सध्या केवळ मालगाड्या सुरू आहेत. लांब पल्ल्यांच्या गाड्यांसोबतच लोकल गाड्यादेखील बंद केल्या गेल्या आहेत. 

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेcorona virusकोरोना वायरस बातम्या