नवी दिल्ली - ज्या गोष्टीची पाकिस्तानच्या मनात धडकी बसली होती अखेर ते भारताने करून दाखवलेच. भारताने आज मध्यम अंतराची बॅलेस्टिक मिसाइल अग्नी ५ चं यशस्वी चाचणी केली आहे. ओडिशातील चांदिपूर येथील इंटीग्रेटेड टेस्ट रेंज केंद्रात ही चाचणी झाली. पाकिस्तानमध्ये या मिसाइलची इतकी धडकी का याचा अंदाज यातून लावू शकतो की, चाचणीच्या एक दिवसाआधी इस्लामाबादच्या थिंक टँकने अग्नी ५ बाबत पाकिस्तानी सरकारला सतर्कतेचा इशारा दिला होता.
पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद येथे थिंक टँक स्ट्रॅटेजिक व्हिजन इन्स्टिट्यूटने अग्नी ५ बाबत पाकिस्तानच्या शहबाज शरीफ सरकारसोबतच आर्मी चीफ असीम मुनीर यांना सावध केले होते. SVR ने म्हटलं होते की, जर भारताने या मिसाइलची यशस्वी चाचणी केली तर ती पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा असू शकते. पाकिस्तान या मिसाइलची भीती यासाठी आहे कारण त्याची रेंज ५ हजार किमीहून अधिक आहे. ही मिसाइल भारताच्या इंटरकॉन्टिनेंटल बॅलेस्टिक मिसाइल अग्नी ५ चा एक भाग आहे. त्याला भारताच्या संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने (DRDO) विकसित केले आहे. DRDO ने याला अपग्रेड करण्याची योजना बनवली होती, ज्याची मारक क्षमता ७५०० किमीपर्यंत वाढणार आहे असं सांगण्यात येते.
दुसऱ्या मॉडेलची चाचणी आधीच घेण्यात आली
गेल्या वर्षी भारताने 'मिशन दिव्यास्त्र' अंतर्गत अग्नी-५ ची पहिली MIRV (Multiple Independently Targetable Re-entry Vehicle) चाचणी यशस्वी केली होती. या तंत्रज्ञानामुळे ही शस्त्र प्रणाली अनेक अण्वस्त्रांना तोंड देऊ शकते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मोहिमेत सहभागी असलेल्या DRDO शास्त्रज्ञांच्या प्रयत्नांचे कौतुक केले होते.
अग्नी ५ मिसाइलचं वैशिष्टे काय?
अग्नी-५ मिसाइल अनेक युद्धसामग्री वाहून नेण्यास आणि एकापेक्षा जास्त लक्ष्यांवर मारा करण्यास सक्षम आहे. ते MIRV तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे म्हणजेच मल्टीपल इंडिपेंडेंटली टार्गेटेबल रीएंट्री व्हेईकल तंत्रज्ञान. ही क्षमता या मिसाइलला एक धोकादायक शस्त्र बनवते. अग्नी-५ च्या यशस्वी चाचणीमुळे भारताने अमेरिका, रशिया, चीन, फ्रान्स आणि युनायटेड किंग्डम यांच्या यादीत स्थान मिळवले आहे. ज्यांच्याकडे MIRV-सुसज्ज ICBMs शस्त्रे आहेत.