शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

चीन सीमेवर भारताने दाखवली वायुशक्ती! अरुणाचलच्या तवांग क्षेत्रात लढाऊ विमानांच्या घिरट्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2022 06:27 IST

घुसखोरीच्या पार्श्वभूमीवर अरुणाचल प्रदेशच्या सीमाभागात भारतीय हवाई दलाच्या विमानांनी केलेला युद्धसराव हा एक प्रकारे चीनला इशारा आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : सीमेवर घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या चीनच्या सैनिकांना पिटाळून लावल्यानंतर आता भारताने आपली वायुशक्ती दाखवण्यास सुरुवात केली आहे.  भारतीय हवाई दलाच्या राफेल व सुखोई लढाऊ विमानांनी ईशान्य भारतातील तेजपूर, जोरहाट, चाबुआ, हाशिमारा येथील हवाई तळांवरून उड्डाण करून तवांग येथील सीमाभागामध्ये गुरुवारी युद्धसराव केला असून, तो आज, शुक्रवारीदेखील सुरू राहणार आहे.

घुसखोरीच्या पार्श्वभूमीवर अरुणाचल प्रदेशच्या सीमाभागात भारतीय हवाई दलाच्या विमानांनी केलेला युद्धसराव हा एक प्रकारे चीनला इशारा आहे. या विमानांचा दोन दिवस चालणारा युद्धसराव पूर्वनियोजित आहे, असे संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे. मात्र, तरीही या विमानांनी भारत-चीनच्या सीमेपर्यंत उड्डाण करणे हा चीनला सूचक इशारा असल्याचे मानण्यात येत आहे.

चिनी सैनिकांच्या अनेक वस्तू केल्या जप्त अरुणाचल प्रदेशमधील तवांग क्षेत्रात ९ डिसेंबर रोजी घुसखोरीच्या प्रयत्नात असलेल्या ६०० चिनी सैनिकांना भारतीय लष्कराने हुसकावून लावले. त्यावेळी झालेल्या झटापटीत चिनी सैनिक आपल्याकडील अनेक वस्तू तिथेच टाकून पळून गेले. त्या वस्तू भारतीय जवानांनी जप्त केल्या असून, त्याची छायाचित्रे सोशल मीडियावर झळकली आहेत. 

ड्रोन पाठविण्याचा चीनचा प्रयत्न फसलातवांगमध्ये दोन देशांच्या सैनिकांमध्ये झालेल्या झटापटीच्या काही दिवस आधी अरुणाचलच्या सीमाभागात चीनने आपले ड्रोन पाठविण्याचा केलेला प्रयत्न भारतीय जवानांनी हाणून पाडला होता. त्यात भारतीय हवाई दलाच्या विमानांचे महत्त्वाचे साहाय्य जवानांना झाले होते. भारताकडून प्रत्युत्तर : गोखलेनियंत्रण रेषा ओलांडून घुसखोरी करणाऱ्या चिनी सैनिकांना भारतीय लष्कर चोख प्रत्युत्तर देऊ शकते. त्यामुळे चीनने कोणत्याही भ्रमात राहू नये, असा इशारा परराष्ट्र खात्याचे माजी सचिव विजय गोखले यांनी दिला आहे. चीनच्या कोणत्याही आगळीकीचा मुकाबला करण्यास भारतीय लष्कर सज्ज आहे, असेही ते म्हणाले. 

टॅग्स :india china faceoffभारत-चीन तणावchinaचीन