शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

भारत कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यास तयार - राजनाथ सिंह

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2020 06:32 IST

भारतीय लष्कराची प्रशंसा करून सिंह म्हणाले की, चिनी कारवाईला भारतीय लष्कराने चोख प्रत्युत्तर दिले व त्यात चीनचे मोठे नुकसान झाले. राजनाथ सिंह हे सांगत असताना पंतप्रधान मोदी सभागृहात उपस्थित नव्हते.

- शीलेश शर्मानवी दिल्ली : भारत कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यास तयार आहे, अशी ग्वाही संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी लोकसभेत दिली. चीनवरून निर्माण झालेल्या परिस्थितीवर ते म्हणाले, परिस्थिती पाहता यापेक्षा जास्त मी बोलणार नाही. राजनाथ सिंह यांनी हे मान्य केले की, चीनने मोठ्या संख्येत लष्कर तैनात करून कराराचे उल्लंघन केले आहे.भारतीय लष्कराची प्रशंसा करून सिंह म्हणाले की, चिनी कारवाईला भारतीय लष्कराने चोख प्रत्युत्तर दिले व त्यात चीनचे मोठे नुकसान झाले. राजनाथ सिंह हे सांगत असताना पंतप्रधान मोदी सभागृहात उपस्थित नव्हते.राजनाथ यांच्या निवेदनावर काँग्रेसचे नेते अधीर रंजन यांना बोलण्याची परवानगी न मिळाल्यामुळे काँग्रेसचे सदस्य विरोध दाखवून सभागृहातून निघून गेले. सभागृहाबाहेर अधीर रंजन यांनी आरोप केला की, सरकार विरोधकांचा आवाज ऐकत नाही कारण त्याला भीती आहे की, जे खोटे बोलले जात आहे ते उघडे पडेल. सरकार चर्चेपासून पळ काढत आहे, ते लडाखवर चर्चा करू इच्छित नाही.राजनाथ सिंह यांच्या भाषणानंतर लगेच काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी टिष्ट्वटरवर म्हटले की, ‘संरक्षणमंत्र्यांच्या बोलण्यातून हे स्पष्ट दिसते की, मोदी यांनी देशाची चिनी अतिक्रमणावर दिशाभूल केली, देश लष्करासोबत उभा राहील. परंतु, मोदीजी तुम्ही कधी चीनविरुद्ध उभे राहाल? चीनकडून आमच्या देशाची जमीन केव्हा परत घेणार, चीनचे नाव घ्यायला घाबरू नका.’सरकारच्या या भूमिकेनंतर काँग्रेसने आरोप केला की, मोदी आणि त्यांचे सरकार संसदेत व बाहेर चिनी घुसखोरीवरून खोटे बोलत आहे.

टॅग्स :chinaचीनRajnath Singhराजनाथ सिंह