शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

India Pakistan: पाकिस्तानच्या सीमेवर कुरापती सुरूच; सलग १२व्या दिवशी गोळीबार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2025 09:39 IST

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात कठोर पावलं उचलली आहेत. भारताच्या भूमिकेनंतर पाकिस्तानच्या सीमेवर कुरापती सुरू झाल्या आहेत. सलग १२व्या दिवशी पाकिस्तानकडून शस्त्रसंधी धुडकावून लावण्यात आली.

India Pakistan News Marathi: पहलगामजवळ असलेल्या बैसरन पठारावर दहशतवादी हल्ला झाला. तेव्हापासून भारत-पाकिस्तान यांच्यातील संबंध ताणले गेले असून, पाकिस्तानकडून सीमेपलिकडून कुरापती केल्या जात आहे. २२ एप्रिलपासून पाकिस्तान लष्कराकडून सातत्याने भारतीय लष्कराच्या चौक्यांवर गोळीबार केला जात आहे. इतर ठिकाणीही शस्त्रसंधींचं पाकिस्तानकडून उल्लंघन केलं जात आहे. पाकिस्तानकडून होत असलेल्या गोळीबाराला भारताकडूनही चोख प्रत्युत्तर दिलं जात असलं, तरी पाकिस्तानच्या कुरघोड्या थांबत नसल्याची स्थिती आहे. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

२२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला. या घटनेला आता १२ दिवस लोटले आहेत. त्यानंतर सीमेवर तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. भारताने दहशतवादाविरोधात कारवाई सुरू केली आहे. पण, दुसरीकडे पाकिस्तानी लष्कराकडूनच सीमेपलीकडून शस्त्रसंधीला वाकुल्या दाखवण्याचे काम सुरू आहे. 

पाकिस्तानी लष्कराकडून कुठे गोळीबार करण्यात आला?

जम्मूतील सीमेलगत असलेल्या पुंछ, राजौरी, मेंढर, नौशेरा, सुंदरबनी, अखनूर या भागात, तर काश्मीरमधील बारामुला सेक्टरमध्ये सीमेवर शस्त्रसंधीचं पाकिस्तानी लष्कराने उल्लंघन केले. 

वाचा >>देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 

पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आल्यानंतर भारतीय लष्करानेही प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला. पाकिस्तान लष्कराकडून सलग १२ व्या दिवशी गोळीबार करण्यात आला आहे. 

भारताकडून पाकिस्तानची कोंडी

पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानची कोंडी करण्यासाठी पावले उचलली आहेत. पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार भारताने स्थगित केला आहे. इतकं नाही, तर वाघा-अटारी सीमाही बंद करण्यात आली आहे. पाकिस्तानी नागरिकांचे सर्व प्रकारचे व्हिसा रद्द करण्यात आले असून, त्यांना परत पाठवण्याची कारवाई सुरू आहे. 

भारताने पाकिस्तानसाठी आपली हवाई हद्द बंद केली आहे. त्याचबरोबर पाकिस्तानसोबतचा व्यापारही थांबवला आहे. पाकिस्तान भारत यांच्यातील टपाल सेवाही बंद करण्यात आली आहे. 

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाBorderसीमारेषाPakistanपाकिस्तानIndian Armyभारतीय जवान