शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
2
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
3
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
4
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
5
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
6
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
7
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
8
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
9
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
10
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
11
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
12
बंपर गिफ्ट...! या मल्टीबॅगर कंपनीनं १-२ नव्हे, वाटले तब्बल 24 बोनस शेअर, लोकांना केलं मालामाल; दिलाय 6100% हून अधिक परतावा
13
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
14
महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क; आराखड्याचे महापालिकेकडून सादरीकरण
15
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
16
रेखा झुनझुनवालांकडे या कंपनीचे तब्बल ५ कोटींहून अधिक शेअर; ₹३०० पार जाणार स्टॉक, एक्सपर्ट्सचा दावा
17
Photo: 'या' वर्षातील बेस्ट बजेट स्मार्टफोन, किंमत १५ हजारांपेक्षा कमी, यादीत मोठे ब्रँड्स
18
Wedding Ritual: लग्नाआधीची विचित्र प्रथा, वरच्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी वधूला करावं लागतं 'हे' काम
19
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
Daily Top 2Weekly Top 5

भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत LRAD यंत्रणा सज्ज, हल्ल्याची तात्काळ मिळणार सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2025 16:18 IST

केंद्र सरकारने उद्या 244 जिल्ह्यांमध्ये मॉक ड्रिल आयोजित केले आहे.

Delhi police LRAD system: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भारताने तयारी तीव्र केली आहे. केंद्र सरकारच्या सूचनेनुसार, उद्या (बुधवार, 7 मे) देशातील 244 जिल्ह्यांमध्ये मॉक ड्रिल आयोजित केले आहेत. जम्मू आणि काश्मीरच्या सीमावर्ती भागात तर गेल्या काही दिवसांपासून सैन्य सराव सुरू आहेत. अशातच, देशाची राजधानी नवी दिल्ली येथील पोलिस मुख्यालयात एलआरएडी (लाँग रेंज अकॉस्टिक डिव्हाइस) प्रणाली तैनात करण्यात आली आहे. 

एलआरएडी प्रणाली म्हणजे काय?एलआरएडी हे एक विशेष प्रकारचे ध्वनी-आधारित उपकरण आहे. लोकांना सतर्क करण्यासाठी याचा वापर केला जातो. एलआरएडी खूप मोठा आवाज निर्माण करतो, जो 500 मीटर ते एक किलोमीटरपेक्षा जास्त अंतरापर्यंत ऐकू येतो. अचानक हल्ला झाल्यास LRAD एक शक्तिशाली सायरन म्हणून काम करतो. याचा उपयोग गर्दीला सावध करण्यासाठी आणि जनतेला आपत्कालीन संदेश देण्यासाठी केला जातो.

भारत सज्ज, पंतप्रधान मोदींची लष्करप्रमुखांसोबत बैठकबालाकोट हल्ल्यानंतर खोल समुद्रातील चाचणी आणि सुधारित क्षमतांसह भारत प्रत्येक आघाडीवर आपली लष्करी तयारी मजबूत करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी तिन्ही सैन्य प्रमुख आणि इतर अधिकाऱ्यांसोबत तयारीचा सतत आढावा घेत आहेत. तसेच, सरकारने सैन्याला पूर्ण स्वातंत्र्य दिले आहे. 

अखनूरमध्ये बंकर तयारपहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावामुळे जम्मू-काश्मीरच्या अखनूर सेक्टरमधील सीमावर्ती गावातील लोक तयारी करत आहेत. सीमेपलीकडून होणाऱ्या गोळीबाराच्या भीतीने, गावकरी भूमिगत बंकर साफ करत आहेत आणि त्यात अन्नपदार्थ आणि साठवून ठेवत आहेत. कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी ही तयारी सुरू आहे. 

सीमावर्ती भागात काय व्यवस्था आहे?जम्मू आणि काश्मीरच्या सीमावर्ती भागात गेल्या काही दिवसांपासून सराव सुरू आहेत. श्रीनगरमधील झेलम नदीच्या काठावर एसडीआरएफने बचाव कार्य केले. युद्धसदृश परिस्थिती उद्भवल्यास त्यांना कसे प्रतिसाद द्यायचे याचे प्रशिक्षण देणे हा या मॉक ड्रिलचा उद्देश आहे. हवाई हल्ले किंवा क्षेपणास्त्र हल्ले यासारख्या आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना जगण्याच्या पद्धती शिकवल्या जात आहेत.

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाIndiaभारतPakistanपाकिस्तानdelhiदिल्ली