शहरं
Join us  
Trending Stories
1
कुणाची किती ताकद हे कळू द्या, एकटे लढून दाखवा; भाजपाचा स्वबळाचा नारा, शिंदेसेनेला आव्हान?
2
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
3
बाराबंकीच्या अवसानेश्वर महादेव मंदिरात चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू, ४० जण जखमी
4
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ठाकरे बंधू पुन्हा भेटले, मनसे-उद्धवसेना युती चर्चांना उधाण; पक्षप्रवेशाचे इनकमिंग थंडावले
6
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
7
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
8
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
9
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
10
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
11
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
12
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
13
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
14
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
15
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
16
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
17
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
18
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
19
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
20
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!

Vaccination Update: कोरोना लसीकरणात भारतानं अमेरिकेला टाकलं मागे; सर्वाधिक लसीकरण करणारा जगातील पहिला देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2021 11:33 IST

भारतानं कोरोना विरोधी लसीकरणात जागतिक महासत्ता म्हणून ओळख असणाऱ्या अमेरिकेला मागे टाकलं आहे.

भारतानं कोरोना विरोधी लसीकरणात जागतिक महासत्ता म्हणून ओळख असणाऱ्या अमेरिकेला मागे टाकलं आहे. सर्वाधिक लसीकरण करणारा भारत जगातील पहिला देश ठरला आहे. गेल्या २४ तासांत भारतात कोरोना लसीचे एकूण १७ लाख २१ हजार २६८ डोस देण्यात आले आहेत. यानंतर एकूण लसीकरणाचा आकडा ३२ कोटी ३६ लाख ६३ हजार २९७ इतका झाला आहे.  भारतात १६ जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली आहे. 

भाजप नेते अमित मालवीय यांनी कोरोना लसीकरणासंदर्भातील ट्विट करुन भारतानं केलेल्या विक्रमाची माहिती दिली आहे. मालवीय यांनी एक आकडेवारी मांडली असून यात अमेरिकेत १४ डिसेंबरपासून लसीकरणाला सुरुवात झाली आणि आतापर्यंत ३२ कोटी ३३ लाख २७ हजार ३२८ डोस देण्यात आले आहेत. तर भारतात १६ जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात होऊनही आज देशानं अमेरिकेला मागे टाकलं आहे. 

ब्रिटनमध्ये सर्वात पहिलं लसीकरणाला सुरुवात जगात सर्वात आधी म्हणजेच ८ डिसेंबर रोजी ब्रिटनमध्ये कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली होती. ब्रिटनमध्ये आतापर्यंत ७ कोटी ६७ लाख ७४ हजार ९९० करोना लसीचे डोस देण्यात आले आहेत. तर इटलीमध्ये २७ डिसेंबरपासून लसीकरणाला सुरवात होऊन आतापर्यंत ४ कोटी ९६ लाख ५० हजार ७२१ डोस देण्यात आले आहेत. यासोबत जर्मनीमध्ये आतापर्यंत ७ कोटी १४ लाख ३७ हजार ५१४ कोरोना लसीचे डोस देण्यात आले आहेत. फ्रान्समध्ये ५ कोटी २४ लाख ५७ हजार २८८ लोकांचं लसीकरण झालं आहे. 

भारतात गेल्या २४ तासांत कोरोनाचे ४६ हजार १४८ नवे रुग्ण आढळले आहेत. यासह एकूण रुग्णसंख्या ३ कोटी २ लाख ७९ हजार ३३१ इतकी झाली आहे. तर एकूण मृत्यूंचा आकडा ३ लाख ९६ हजार ७३० इतका झाला आहे. सध्या देशात ५ लाख ७२ हजार ९९४ सक्रीय रुग्ण आहेत. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या