शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
2
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
3
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
4
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
5
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
6
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
7
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
8
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
9
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
10
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
11
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
12
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
13
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
14
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
15
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
16
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
17
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
18
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
19
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
20
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: धोका वाढला! कोरोना तिसऱ्या टप्प्यात; आता वेगाने होऊ शकतो गुणाकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2020 16:46 IST

CoronaVirus: तिसऱ्या टप्प्यात वेगानं वाढणार रुग्णांची संख्या; आरोग्य यंत्रणेची पुरेशी तयारी नाही

नवी दिल्ली: कोरोनाचा धोका वाढला असून तो तिसऱ्या टप्प्यात पोहोचल्याचं कोरोनाबाधितांवर उपचार करणाऱ्या रुग्णालयांचे संयोजक डॉ. गिरधर ग्यानी यांनी सांगितलं. कोरोना तिसऱ्या टप्प्यात पोहोचला असून त्याचं सामुदायिक संक्रमण सुरू झाल्याची माहिती त्यांनी दिली. 'द क्विंट' या इंग्रजी वृत्त संकेतस्थळानं याबद्दलचं वृत्त दिलंय. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होण्याची शक्यता आहे.  दोनच दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली प्रख्यात डॉक्टरांची आणि आरोग्य सेवा देणाऱ्या कंपन्यांमधील महत्त्वाच्या अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीला ग्यानी उपस्थित होते. कोरोनाच्या प्रादुर्भावात सामुदायिक संक्रमण अतिशय महत्त्वाचा टप्पा आहे. या टप्प्यात कोरोना अतिशय वेगानं पसरतो आणि त्याचा केंद्रबिंदू शोधणं अवघड होतं. या टप्प्यात अनेकांमध्ये कोरोनाची लक्षणं दिसू लागतात. त्यामुळे तो नेमका कोणाकडून पसरला आहे, याचा माग काढणं कठीण असतं, अशा शब्दांत ग्यानी यांनी तिसऱ्या टप्प्यात काय होऊ शकतं, याची माहिती दिली.आपण तिसऱ्या टप्प्यात पोहोचलो आहोत. आपल्या हाती अतिशय कमी वेळ उरला आहे. वाढणाऱ्या रुग्णांसाठी रुग्णालयं सज्ज ठेवावी लागणार आहेत. मात्र त्यासाठीही पुरेसा वेळ शिल्लक नाही. येत्या काही आठवड्यांमध्ये कधीही रुग्णांची संख्या अचानक वाढू शकते. त्यासाठी आवश्यक रुग्णालयं आणि प्रशिक्षित वैद्यकीय कर्मचारी वर्ग आपल्याकडे नाही, अशा शब्दांत ग्यानी यांनी वास्तव सांगितलं.कोरोना चाचणी घेत असताना सरकार अजूनही जुन्याच पद्धतींचा वापर करत असल्याचं ग्यानी म्हणाले. यामध्ये तातडीनं बदल करायला हवा, असंदेखील ते पुढे म्हणाले. 'खोकला, श्वासोच्छवासात समस्या, ताप अशी तिन्ही लक्षणं आढळून येत असल्यावरच सध्या कोरोना चाचणी घेतली जात आहे. यातलं एक केवळ लक्षण असल्यास चाचणीच घेतली जात नाही. ही पद्धत बदलायला हवी. सरकारकडे कोरोना चाचणी करणारी पुरेशी किटदेखील नाहीत,' अशी महत्त्वाची माहिती ग्यानी यांनी दिली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या