शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

भारताने एक मिग 21 विमान गमावले, एक पायलट बेपत्ता- परराष्ट्र मंत्रालय

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2019 16:47 IST

भारतीय हद्दीत पाकिस्तानने हवाई हल्ला केल्यानंतर त्यास भारताने चोख प्रत्युत्तर दिले.

नवी दिल्ली-  भारतीय हद्दीत पाकिस्तानने हवाई हल्ला केल्यानंतर त्यास भारताने चोख प्रत्युत्तर दिले. भारताने पाकिस्तानचे एक लढाऊ विमान जमिनीवर पाडले आहे. दरम्यान, या कारवाईत भारताचेही एक मिग 21 विमान गमावल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी दिली आहे. तसेच भारताचा एक वैमानिक बेपत्ता असल्याचंही ते म्हणाले आहेत. भारतानं काल पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले होते. त्यानंतर पाकिस्ताननंही भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी भारतानं पाकिस्तानचं एक विमान पाडलं. या कारवाईत भारतानंही एक मिग 21 विमान गमावलं आहे. तसेच एक वैमानिक बेपत्ता आहे. पाकिस्तान दावा करत आहेत की तो बेपत्ता जवान त्यांच्या ताब्यात आहे. त्याची सत्यता आम्ही पडताळून पाहत आहोत, असंही परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार म्हणाले आहेत. 

पाकिस्तानच्या मीडिया आणि सरकारकडून या खोट्या बातम्या पसरविण्यात आल्याने तेथील सोशल मीडियावरही हा व्हिडीओ अन् फोटो व्हायरल झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पाकिस्तानी सैन्याकडून भारताचे विमान पाडल्याचा दावा केला जात असला तरी भारतीय सैन्याकडून या वृत्ताला अद्याप अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही. पाकिस्ताननं एका विंग कमांडरला अटक केल्याचा दावा केला असून, त्याचं नाव अभिनंदन वर्थमान असल्याचं सांगितलं जातंय. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी पत्रकार परिषद घेत भारताची बाजू मांडली आहे. 'पाकिस्तानची विमाने आपल्या हद्दीत घुसल्यानंतर सतर्क असलेल्या सुरक्षा यंत्रणांनी पाकिस्तानचा हल्ला करण्याचा मनसुबा हाणून पाडला भारताच्या 'मिग 21' विमानाने पाकिस्ताननं पाकिस्तानच्या एका विमानाला जमिनीवर पाडले. ते विमान पाकिस्तानच्या हद्दीत कोसळताना पाहायला मिळाले. परंतु या कारवाईदरम्यान भारतानंही एक 'मिग 21' विमान गमावले. तसेच त्या विमानातील एक वैमानिक अद्यापही बेपत्ता आहे. पाकिस्ताननं एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्या व्हिडीओमध्येही एक व्यक्ती अभिनंदन असल्याचं सांगत आहे. तसेच तो व्यक्ती वायुसेनेचे विंग कमांडर असल्याचीही माहिती देत आहे. त्याचा सर्व्हिस नंबर 27981 असल्याचंही या व्हिडीओतून दिसत आहे. पाकिस्ताननं सांगितलं आहे की, अभिनंदन 16 डिसेंबर 2015मध्ये वायुसेनेत दाखल झाला होता. व्हिडीओमध्ये दिसत असलेला व्यक्ती जखमी असून, त्याला दोरीच्या सहाय्यानं बांधण्यात आलं आहे. परंतु या व्हिडीओची सत्यता अद्याप पडताळली जात आहे. 

टॅग्स :Indian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकsurgical strikeसर्जिकल स्ट्राइकPakistanपाकिस्तान