शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान मोदींनी ओढली लक्ष्मणरेषा, २०४७ पर्यंत भारत गाठणार मोठं लक्ष्य! काय म्हणाले PM वाचा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2022 17:02 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत येत्या २५ वर्षात म्हणजेच २०४७ सालापर्यंत विकसित देश म्हणून ओळखला जाईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.

नवी दिल्ली-

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत येत्या २५ वर्षात म्हणजेच २०४७ सालापर्यंत विकसित देश म्हणून ओळखला जाईल, असा विश्वास व्यक्त केला आहे. कर्नाटकमधील बंगळुरूमध्ये आयोजित ग्लोबल इनव्हेस्टर्स मीटमध्ये (Global Investors Meet) ते बोलत होते. हे लक्ष्य गाठण्यासाठी देशातील गुंतवणूक महत्वाची भूमिका पार पाडणार आहे, असंही ते म्हणाले. 

भारतात गुंतवणूक करणं म्हणजे जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या देशातील गुंतवणूक, स्वच्छ आणि सुरक्षित भविष्यासाठी गुंतवणूक करणं ठरणार आहे, असं मोदी म्हणाले. गुंतवणूक आणि मानव संसाधनांवर लक्ष्य केंद्रीत करुन विकासाची लक्ष्य गाठण्यासाठी खूप मोठी मदत होईल असं मोदींनी सांगितलं. 

स्टार्ट-अप इकोसिस्टमचं केलं कौतुकपंतप्रधान मोदींनी भारताच्या स्टार्टअप इकोसिस्टमबाबत बोलताना मुख्यत्वे कर्नाटक राज्याचं याबाबत कौतुक केलं. भारतातील १०० युनिकॉर्नमधील ४० तर एकट्या कर्नाटकातील आहेत. म्हणजेच त्यांचं मुख्यालय कर्नाटक राज्यात आहे. कर्नाटक राज्य स्टार्टअप इकोसिस्टममध्ये एक डबल इंजिन शक्ती आहे, असंही मोदी म्हणाले. भारताचं स्टार्टअप इकोसिस्टम जगात अमेरिका आणि चीनच्यानंतर नंतर जगात तिसऱ्या स्थानावर आहे. 

आद्योगिक क्रांतीत भारतीयांची महत्वाची भूमिका"मी गुंतवणुकदारांचं लक्ष मुख्यत्वे पीएम गतीशक्ती नॅशनल मास्टर प्लानकडे केंद्रीत करू इच्छितो. या प्लाननं देशातील इन्फास्ट्रक्चरची निर्मितीची रुपरेषाच पूर्णपणे बदलली आहे. जग आज जेव्हा इंडस्ट्री ४.० च्या दिशेनं प्रवास करत आहे. यात औद्योगिक क्रांतीत भारतीय तरुणांची भूमिका आणि टॅलेंट पाहून जगही आश्चर्यचकीत झालं आहे", असं मोदी म्हणाले. 

८ वर्षात ८० हजार स्टार्टअप्सभारतात गेल्या ८ वर्षात ८० हजारहून अधिक स्टार्टअप्स तयार झाले आहेत. आज भारतातील प्रत्येक सेक्टर युवाशक्तीच्या ताकदीनं पुढे जात आहे. गेल्या वर्षी भारतानं रेकॉर्डब्रेक एक्सपोर्टची नोंद केली. कोरोनानंतरची परिस्थिती पाहता भारताची ही कामगिरी नक्कीच महत्वपूर्ण आहे, असंही मोदी म्हणाले. देशातील युवांच्या क्षमता वाढवण्यासाठी आम्ही इंडियन एज्युकेशन सिस्टममध्ये महत्वपूर्ण बदल केले. गेल्या काही वर्षात भारतात विद्यापीठं, टेक्नोलॉजी विद्यापीठं आणि मॅनेजमेंट विद्यापीठांच्या संख्येत ५० टक्क्यांनी वाढ केली आहे, असं मोदींनी सांगितलं.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी