शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

भारत हिंदू राष्ट्रच, त्यावर तडजोड नाही- मोहन भागवत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2019 08:39 IST

पुस्तक प्रदर्शनाच्या कार्यक्रमात भागवत यांचं भाषण

भारत हे हिंदू राष्ट्र असून याबाबतीत कोणतीही तडजोड होऊ शकत नाही, असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी म्हटलं आहे. संघाला कोणत्याही विचारसरणीत बांधलं जाऊ शकत नाही. कारण संघ कोणत्याही विचारावर विश्वास ठेवत नाही, असंदेखील ते म्हणाले. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे प्रमुख सुनील आंबेकर यांच्या पुस्तकाचं प्रकाशन करताना मोहन भागवत यांनी त्यांचे विचार मांडले. सरसंघचालक मोहन भागवत यांनी संघाच्या विचारसरणीवर विस्तृत भाष्य केलं. 'संघाच्या विचारसरणीबद्दल काहीही भाष्य केल्यास ते चुकीचं ठरणार नाही. मी संघाला पूर्णपणे समजू शकतो, असं संघाचे संस्थापक असलेल्या डॉ. हेडगेवार यांनीदेखील कधी म्हटलं नाही. कित्येक वर्ष सरसंघचालक राहिल्यानंतर, आता मी कदाचित संघाला समजू लागलो आहे, असं गुरुजी म्हणाले होते,' अशी आठवण भागवत यांनी सांगितली. संघात मतभेद असू शकतात, पण मनभेद नाहीत, असंदेखील भागवत म्हणाले. संघ उदारमतवादी संघटना आहे. संघाशी संबंधित असलेल्या प्रत्येक व्यक्तीची खास विषयांवर वेगवेगळी मतं असू शकतात. संघाशी जोडल्या गेलेल्या व्यक्तीचे प्रत्येक मुद्द्यांवरील विचार संघासारखेच असावेत, असं काही नाही. तसं असणं गरजेचंदेखील नाही, असं सरसंघचालकांनी म्हटलं. भाजपाशी होणारे मतभेददेखील अतिशय सामान्य आहेत. मात्र आम्ही वादविवादांमधून नव्हे, तर सहमतीनं निर्णय घेण्याला महत्त्व देतो, असं त्यांनी म्हटलं. 

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघHinduहिंदू