शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
3
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
4
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
5
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
6
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
7
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
8
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
9
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
10
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
11
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
12
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
13
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
14
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
15
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
16
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
17
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
18
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
19
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
20
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय

जगात सर्वाधिक बेरोजगारी भारतात, अर्थतज्ज्ञ कौशिक बसू यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2022 06:42 IST

‘जागतिक बँकेचे माजी अर्थतज्ज्ञ कौशिक बसू यांचा दावा

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : भारतीय अर्थव्यवस्थेचा ढाचा भक्कम असला तरीही वाढत्या ‘विभाजन’ आणि ‘ध्रुवीकरण’मुळे देशाच्या विकासाचा ‘पाया’ खराब होत आहे. भारतात सध्या सर्वांत मोठे आव्हान बेरोजगारी आहे. बेरोजगारी दर २४ टक्क्यांच्यावर पोहोचला असून, तो जगात सर्वाधिक आहे, असे जागतिक बँकेचे माजी अर्थतज्ज्ञ कौशिक बसू यांनी मंगळवारी सांगितले.

कोणत्याही देशाचा विकास केवळ आर्थिक धोरणांवर अवलंबून नाही. राष्ट्राच्या आर्थिक यशामध्ये लोकांमधील विश्वास हा महत्त्वाचा घटक आहे. सध्या भारतीय समाजात विभाजन आणि ध्रुवीकरण वाढत आहे. हे केवळ खेदजनकच नाही तर देशाच्या विकासाच्या पायालाही हानी पोहोचवत आहे, असे अर्थतज्ज्ञ बसू यांनी म्हटले आहे. बसू यांच्या मते, मोठा उद्योजक वर्ग, अधिक कुशल कामगार आणि जीडीपी (एकूण देशांतर्गत उत्पादन) गुणोत्तरामध्ये जास्त गुंतवणूक यामुळे भारताचा पाया मजबूत आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून कुशल कामगारांची संख्या कमी होत आहे. त्याचा फटका देशाला बसू शकतो.भारतातील महागाईचे कारण जागतिक आहे. कोरोना महामारी आणि युक्रेनमधील युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत झाल्याने महागाई वाढली आहे. हे भारताच्या नियंत्रणात नसले तरीही गरीब आणि मध्यमवर्गीयांना यापासून वाचविण्यासाठी कोणतीही पुरेशी पावले उचलली जात नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे.

लहान व्यापारी, कामगार व शेतकऱ्यांना थेट मदत द्या!देशात किरकोळ महागाईत मोठी वाढ झाली आहे. आपण गेल्या २४ वर्षांत महागाई वाढल्याचे पाहिले नाही. सध्या जे काही होत आहे ते १९९० च्या दशकाच्या उत्तरार्धाची आठवण करून देत आहे. त्यावेळी पूर्व आशियाई संकटाचा परिणाम भारतात होऊ लागला होता. महागाई आणखी वाढत जाणार असून, सरकारने तातडीने पावले उचलायला हवीत. लहान व्यापारी, कामगार आणि शेतकऱ्यांना थेट आणि तातडीची मदत देण्याची गरज असल्याचे बसू यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीEconomyअर्थव्यवस्थाjobनोकरीUnemploymentबेरोजगारी