शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

भारताचा एकही शत्रू नाही... पाकिस्तान, चीन आहेत तरी कोण ? 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2017 23:46 IST

पाकिस्तानसोबत भारताचे संबंध नेहमीच तणावपूर्ण राहिले आहेत. तर दुसरीकडे डोकलामच्या मुद्यावरून चीनकडूनदेखील युद्धाची भाषा करण्यात येत आहे. या देशांतील अनेक नेते भारताला

- परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाकडे माहितीच नाही नागपूर, दि. 7 - पाकिस्तानसोबत भारताचे संबंध नेहमीच तणावपूर्ण राहिले आहेत. तर दुसरीकडे डोकलामच्या मुद्यावरून चीनकडूनदेखील युद्धाची भाषा करण्यात येत आहे. या देशांतील अनेक नेते भारताला शत्रूराष्ट्र मानतात. मात्र भारताच्या लेखी बहुतेक जगातील एकही राष्ट्र शत्रूराष्ट्र नाही. म्हणूनच की काय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाकडे यासंदर्भात माहितीच उपलब्ध नाही. माहितीच्या अधिकारातून हे वास्तव समोर आले आहे. उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाकडे विचारणा केली होती. कुठले देश शत्रूराष्ट्राच्या यादीत आहेत आणि त्यांचा समावेश कधीपासून करण्यात आला आहे, हे प्रश्न त्यांनी विचारले होते. यासंदर्भात परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाकडून विविध देशांबाबत उत्तर देण्यात आली. मात्र बहुतांश उत्तरांत संबंधित माहिती उपलब्ध नाही किंवा ‘निरंक’ असे नमूद करण्यात आले आहे. अगदी पाकिस्तान, चीनसंदर्भातदेखील असेच उत्तर देण्यात आले आहे. पाकिस्तान शत्रूराष्ट्र आहे की नाही, याची मंत्रालयाकडे माहिती नाही. तर चीनबाबत ‘निरंक’ असे उत्तर देण्यात आले आहे. बांगलादेशबाबतदेखील काहीच माहिती नसल्याचे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे. पाकिस्तानकडून वारंवार होणाºया दहशतवादी कारवाया, भारतातील नेत्यांनी उघडपणे दिलेला इशारा, चीनशी ताणले गेलेले संबंध व तेथील सैन्य आणि नेत्यांकडून येणाºया धमक्या या पार्श्वभूमीवरदेखील ही शत्रूराष्ट्र आहेत की नाही, याची माहिती नाही ही बाब बुचकळ््यात टाकणारी आहे. आखाती राष्ट्रांत एकही शत्रू नाही परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या उत्तरात बांगलादेश, पाकिस्तान, नेपाळ, ब्रुनेई, इंडोनेशिया, तिमोर यांच्याबाबत काहीही माहिती उपलब्ध नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तर भूतान, म्यानमार, चीन ही शत्रूराष्ट्रं आहेत की नाही, याचे उत्तर ‘निरंक’ असे देण्यात आले आहे. आखाती राष्ट्रांत मात्र देशाचा एकही शत्रू नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तर अमेरिका व कॅनडा यांच्याशी अतिशय चांगले संबंध असल्याचे उत्तर देण्यात आले आहे.