शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
5
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
6
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
7
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
8
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
9
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
10
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
11
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
12
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
13
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
14
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
15
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
16
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
17
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
18
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
19
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2025 19:32 IST

India vs Pakistan, LoC Border Terrorism: अटकेनंतर प्रागवाल परिसरात मोठ्या प्रमाणात शोध मोहिमेला सुरुवात

India vs Pakistan LoC Border Terrorism: भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवर घुसखोरीचा एक मोठा कट उधळून लावण्यात आला. बीएसएफने एका संशयित दहशतवाद्याला अटक केली. दोन दिवसांच्या कारवाईत बीएसएफला मोठे यश मिळाले. अटक करण्यात आलेला संशयित जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांच्या मोठ्या गटाला भारतात घुसवण्याची योजना आखत होता. मिळालेल्या वृत्तानुसार, जम्मू जिल्ह्यातील प्रागवाल सेक्टरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेवर ही अटक करण्यात आली. संशयित दहशतवाद्याकडे चिनी बनावटीचे शस्त्र असल्याचा संशय आहे. संशयित दहशतवाद्याच्या अटकेनंतर बीएसएफने प्रागवाल परिसरात मोठ्या प्रमाणात शोध मोहीम सुरू केली आहे.

दहशतवाद्याची कसून चौकशी

प्रागवालमधील संशयिताला अटक केल्यानंतर आजूबाजूच्या परिसरात सुरक्षा वाढवण्यात आली आहे. सूत्रांनी पुढे सांगितले की, त्या व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी आणि संवेदनशील परिसरात त्याच्या उपस्थितीमागील हेतू निश्चित करण्यासाठी प्राथमिक चौकशी सुरू आहे.

दहशतवादी कमांडरला परत पाठवण्याचे प्रयत्न

सुरक्षा यंत्रणांना संशय आहे की जम्मू-काश्मीरमधून अनेक वर्षांपूर्वी पाकिस्तानात पळून गेलेल्या दहशतवादी कमांडरना परत भारतात पाठवण्याचा प्रयत्न ISI कडून केला जात आहे. काही दिवसांपूर्वीच बीएसएफच्या महानिरीक्षकांनी सांगितले की पाकिस्तानी हद्दीतील दहशतवादी लाँच पॅड पुन्हा सक्रिय झाले आहेत. त्यामुळे बीएसएफ अधिक सतर्क झाले आहे. अलिकडेच पाकिस्तानने दहशतवादी लाँच पॅड सीमेपासून दूर हलवल्याची बातमी समोर आली होती. भारताविरुद्ध नवीन कट रचण्याचे मनसुबे रोखण्यात आले आहेत असे पाकिस्तानला दाखवायचे होते. त्यामुळे हे पाऊल उचलले होते. भारतीय लष्कर सीमेवरील सर्व पाकिस्तानी हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.

लष्कर आणि जैश यांच्यात पाकिस्तानमध्ये बैठक

६ नोव्हेंबरला पाकिस्तानमध्ये लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मद यांच्यात एक मोठी बैठक झाल्याची बातमी समोर आली आहे. जिहादींच्या या बैठकीचे विशेष फोटोदेखील प्रसिद्ध करण्यात आले. लष्करचा उपप्रमुख सैफुल्लाह कसुरी याच्यासह अनेक जैश कमांडर या बैठकीत उपस्थित होते. ऑपरेशन सिंदूरपूर्वी बहावलपूरमध्येही अशीच एक बैठक झाल्याची माहिती आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : India Foils Pakistan Infiltration Plot; Terrorist Arrested on LoC

Web Summary : BSF thwarted a Pakistan-backed infiltration attempt, arresting a suspected Jaish-e-Mohammed terrorist near the LoC in the Pragwal sector. The terrorist planned to facilitate a large group's entry. Security heightened, investigation underway, amid concerns of reactivated launchpads and ISI's attempts to send commanders back.
टॅग्स :TerrorismदहशतवादPakistanपाकिस्तानBorderसीमारेषा