शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

भारताने उडवली पाकिस्तानची दाणादाण

By admin | Updated: October 23, 2016 20:22 IST

आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत रविवारी झालेल्या अटीतटीच्या लढतीत भारताने पाकिस्तानवर 3-2 ने मात केली.

ऑनलाइन लोकमत
कुआंटन, दि. 23 -आशियाई चॅम्पियन चषक हॉकी स्पर्धेत अव्वल मानांकित भारताने पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान संघाचा ३-२ असा फडशा पाडला. हा महामुकाबला चांगलाच रंगला. 
अनेक दिवसापासून चर्चेत असलेल्या या सामन्याच्या प्रारंभी पाकिस्तान संघाच्या खेळाडूंनी जोरदार सुरूवात करत भारतीय संघावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. मात्र भारताच्या खेळाडूंनी आपले धैर्य आणि संयम राखत पाकच्या हॉकीपटूंना जोरदार उत्तर दिले. युवा स्ट्रायकर प्रदीप मोर याने आपल्या १३व्या आंतरराष्ट्रीय सामन्यात खेळतांना पहिला गोल नोंदविला. त्यामुळे सामन्याच्या ११ व्या मिनीटातच भारताला आघाडी मिळाली. त्यानंतर मात्र पाकिस्तानच्या मोहम्मद रिजवान याने ३१ व्या मिनिटाला मोहम्मद इरफान (ज्यु.) याने ३९ व्या मिनिटाला गोल करत २-१ अशी आघाडी घेत भारताच्या गोटात चिंतेचे वातावरण निर्माण केले.
 भारताच्या रूपिंदर पाल सिंह याने ४३ व्या मिनटाला भारताला  एकमात्र पेनल्टी कार्नरच्या आधारे बरोबरी मिळवून दिली. तर रमनदीप याने तलविंदर सिंह याने दिलेल्या पासवर गोल करत ३-२ अशी आघाडी मिळवून दिली.  त्यामुळे भारताला विजय साध्य झाला.  या विजयामुळे भारताचे तीन सामन्यात सात गुण झाले आहेत. भारताने आपल्या पहिल्या सामन्यात जपान संघाचा १०-२ असा पराभव केला होता. तर दूस-या सामन्यात मात्र भारतीय संघाला दक्षिण कोरिया संघाकडून १-० असा पराभव स्विकारावा लागला होता.(वृत्तसंस्था)
 
भारताच्या शानदार चाली, जोरदार प्रत्युत्तर-
 
हा सामना पहिल्या पासूनच चुरशिचा राहिला. पाकिस्तान संघाला  सामन्याच्या पहिल्या मिनिटातच पहिला पेनल्टी कार्नर मिळाला. मात्र भारतीय गोलकीपर पीआर. श्रीजेश याने पाक संघाच्या चेहºयावर हसु उमलू दिले नाही. श्रीजेश याने पहिल्यांदा मोहम्मद अलीम बिलाल याने सरकावलेला चेंडू पॅडने रोकला. त्यानंतर  पाकिस्तान संघाने चौथ्या मिनिटात आणखी एक शानदार फळी रचत मात्र भारतीय हॉकीपटूंनी त्यांचे हे प्रयत्नही हाणून पाडले. भारतीय हॉकीपटूंनी देखील या काळात जोरदार चाली रचल्या. मात्र भारतीय हाकीपटूंना त्यात अपयश आले. भारताकडून तलविंदर सिंह याने पहिला गोल साधून दिला. प्रदीप याने २२ व्या मिनिटाला भारतीय संघाला आघाडी मिळवून दिली. प्रदीप याने मारलेला फटका रोखण्यात पाकिस्तानी गोलकीपर इमरान बट याला पुर्णत: अपयश आले. या नंतर संकटात सापडलेल्या पाक संघाने या नंतर लागोपाठ हल्ले करण्याचे प्रयत्न केले. मात्र भारतीय हॉकीपटूंनी ते हाणून पाडले. मध्यांतरला भारतीय संघ १-० ने आघाडीवर होता. त्यानंतरच्या सत्रात पाकिस्तानने मध्यांतरानंतरच्या पहिल्याच मिनिटात गोल साधत बरोबरी साधली. मात्र त्यानंतरच्या खेळात पाक संघाला वरचढ होऊ न देता सामन्यावर नियंत्रण ठेवत विजयी गोल साधत पाकचा फडशा पाडला.