शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
3
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
4
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
5
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
6
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
7
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
8
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
9
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
10
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
11
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
12
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
13
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
14
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
15
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
16
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
17
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
18
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
19
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
20
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द

India China FaceOff: "मोदींनी जपून बोलावे, अन्यथा चीनच्या कुटिलतेस बळ मिळेल"

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2020 03:40 IST

चीनच्या कुटिल कारस्थानांना बळ मिळेल असे बोलणे टाळावे, असा सल्ला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी सोमवारी दिला.

शीलेश शर्मा नवी दिल्ली : सीमेवर तणाव निर्माण झालेला असताना सध्याची वेळ संपूर्ण देशाने एकजूट होऊन चीनच्या दु:साहसास कणखरपणे उत्तर देण्याची आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याविषयी जपून बोलावे आणि चीनच्या कुटिल कारस्थानांना बळ मिळेल असे बोलणे टाळावे, असा सल्ला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी सोमवारी दिला.पंतप्रधान व केंद्र सरकारने काळाचे आव्हान स्वीकारून राष्ट्रीय सुरक्षा व अखंडतेसाठी प्राणांची आहुती देणाऱ्या कर्नल संतोष बाबू व अन्य भारतीय सैनिकांच्या बलिदानाच्या कसोटीवर उतरावे. यात जराही कुचराई करणे म्हणजे जनादेशाचा ऐतिहासिक विश्वासघात ठरेल, असेही माजी पंतप्रधानांनी म्हटले आहे. भारत चीनच्या धमक्यांपुढे कधीही झुकणार नाही आणि भौगोलिक अखंडतेशी कधीही तडजोड करणार नाही, असे नमूद करून निवेदनात ते लिहितात की, आज देश इतिहासाच्या एका नाजूक वळणावर उभा आहे. या घडीला आपले सरकार काय निर्णय घेते व कोणती पावले उचलते यावर भावी पिढ्या मूल्यमापन करणार आहेत. हे कर्तव्य पार पाडण्याची जबाबदारी देशाच्या नेतृत्वाच्या खांद्यावर आहे. आपल्या लोकशाहीत ही जबाबदारी पंतप्रधानांची आहे. जाहीर वक्तव्यांनी देशाची सुरक्षा, अखंडता यावर प्रभाव पडू शकतो याची जाणीव ठेवून पंतप्रधानांनी सावध राहायला हवे.>सत्य कधीही दडपले जाऊ शकत नाहीचीनसोबत सीमेवर संघर्ष होऊन २० भारतीय जवानांना हौतात्म्य आल्यानंतर प्रथमच प्रसिद्ध केलेल्या निवेदनात डॉ. मनमोहनसिंग यांनी म्हटले आहे की, भ्रामक प्रचार कधीही कूटनीती व खंबीर नेतृत्वाला पर्याय होऊ शकत नाही. तसेच स्तुतिपाठकांनी असत्याचे अवडंबर माजविले तरी त्याने सत्य कधीही दडपले जाऊ शकत नाही.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी