शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

India China Faceoff: चीनला दणका! भारत देणार 'मेडिकल' धक्का; ड्रॅगनला घायाळ करण्याची रणनीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2020 10:09 IST

वैदकीय क्षेत्रातील चीनवरील अवलंबित्व कमी करण्याची तयारी

नवी दिल्ली: लडाख सीमेवरील तणाव वाढला असताना भारतानं चीनची सर्व बाजूनं कोंडी करण्याची तयारी सुरू केली आहे. भारतानं सीमावर्ती भागातील फौजफाटा वाढवत चीनला प्रत्युत्तर देण्याच्या दृष्टीनं रणनीती तयार केली आहे. त्याचवेळी चीनकडून होणारी निर्यात कमी करण्यावरही भर दिला जात आहे. कोरोना संकटाच्या काळात चीन जगभरात वैद्यकीय साहित्याची निर्यात करत आहे. यामध्ये भारताचाही समावेश आहे. मात्र चीनकडून होणारी आयात पूर्णपणे बंद करण्याची तयारी भारतानं सुरू केली आहे. वैद्यकीय साहित्यासाठी भारत बऱ्याच प्रमाणात चीनवर अवलंबून आहे. यामध्ये वैद्यकीय उपकरणांचा प्रामुख्यानं समावेश आहे. भारत मोठ्या प्रमाणात चीनमधून वैद्यकीय साहित्य मागवतो. यामध्ये थर्मामीटरपासून इलेक्ट्रोकार्डियोग्राफ (इसीजी) उपकरणांचा समावेश आहे. भारत जगभरातून वैद्यकीय साहित्य, उपकरणं आयात करतो. त्यातील ११ टक्के साहित्य चीनमधून येतं.काही उपकरणांच्या बाबतीत तर भारताचं चीनवरील अवलंबित्व ८७ टक्के इतकं आहे. यामध्ये ऍक्युपंचर उपकरणं, प्रेग्नन्सी किट, क्लिनिकल थर्मामीटर आणि कपड्यांच्या साहित्याचा समावेश आहे. २०१९-२० मध्ये भारतानं ४२ हजार २४५ कोटी रुपये किमतीचं वैद्यकीय साहित्य चीनमधून आयात केलं. यातील ४ हजार ५५९ कोटी रुपयांची आयात चीनमधून झाली होती. त्यामुळे आता वैद्यकीय क्षेत्रातून स्वावंलबित्वासाठी योजना आखण्याची मागणी केली जात आहे.गेल्या ४ महिन्यांत भारतातील वैद्यकीय क्षेत्र वेगानं वाढलं आहे. या कालावधीत मोठ्या प्रमाणात वैद्यकीय साहित्यांचं उत्पादन झालं आहे. आधी भारताची पीपीई किट निर्मितीची क्षमता वर्षाकाठी ६२ लाख इतकी होती. ती आता थेट २१ कोटींवर जाऊन पोहोचली आहे. आधी देशाची व्हेंटिलेटर निर्मितीची क्षमता ३ हजार ३६० इतकी होती. हा आकडा आता ३ लाख १४ हजारांवर जाऊन पोहोचला आहे. एन-९५ मास्क तयार करण्याची क्षमताही १ कोटी ३० लाखांवरून १५ कोटींच्या पुढे गेली आहे. सरकारनं सहाय्य केल्यास चीनमधून होणारी ४ हजार कोटींची आयात थेट १ हजार कोटींवर येईल, असा दावा वैद्यकीय क्षेत्राकडून केला जात आहे.भारताला खास मित्राचं बळ; चीनला टक्कर देण्यासाठी पाठवणार लष्करआता चीनची नवी घुसखोरी; गलवान खोऱ्यातही ठोकले तंबू!ड्रॅगनचा तीळपापड! भारतीय जवानांनी चीनकडून नियंत्रण रेषा बदलण्याचा प्रयत्नच पाडला हाणून

टॅग्स :chinaचीनcorona virusकोरोना वायरस बातम्याladakhलडाख