शहरं
Join us  
Trending Stories
1
येमेनमध्ये इस्रायलच्या हवाई हल्ल्यात हुथी सरकारचे पंतप्रधान अहमद अल-राहवी ठार
2
केंद्र सरकारच्या GST सुधारणांना विरोधी पक्षांचा पाठिंबा, पण..; जयराम रमेश स्पष्टच बोलले
3
BREAKING: मनोज जरांगेंना तिसऱ्या दिवशीही आझाद मैदानात आंदोलनास परवानगी
4
प्रेमप्रकरणातून आंबा घाटात तरूणीचा खून; मृतदेह दरीत फेकून दिला
5
'कोणता कायदा रोज अर्ज करण्यास सांगतो?'; रोजच्या परवानगीच्या अटीमुळे मनोज जरांगे पोलिसांवर चिडले
6
ITR साठी आयकर विभाग मेसेज पाठवतं, वार्षिक उत्पन्न ३ लाख रुपये असणाऱ्यांनी फाइल करावी का?
7
मोठी बातमी! मनोज जरांगे यांच्या मुंबईतील आंदोलनात सहभागी तरुणाचा मृत्यू
8
क्वाड शिखर परिषदेसाठी डोनाल्ड ट्रम्प भारतात येणार? समोर आली मोठी माहिती...
9
मनोज जरांगेंची भाषा मुजोरपणाची, गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल; पवार-ठाकरेंवरही संतापले
10
सप्टेंबरची सुरुवात गौरी पूजनाने; भद्रा राजयोगात ९ राशींना बंपर लॉटरी, सुख, संपत्ती, सुबत्तेचा काळ
11
७ वर्षांनी पंतप्रधान मोदी चीनला पोहचले, रेड कार्पेटवर भव्य स्वागत; पुतिन-जिनपिंग यांना भेटणार
12
KCL 2025 मध्ये सलमानची हवा! १२ चेंडूत ११ उत्तुंग षटकारांसह २६ चेंडूत कुटल्या ८६ धावा (VIDEO)
13
अमित शाहांच्या विमानात तांत्रिक बिघाड; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मदतीला सरसावले
14
इंडोनेशियात आमदारांच्या पगारावरून गोंधळ, जमावाने विधानसभा जाळली; तिघांचा मृत्यू
15
सपा-काँग्रेसनं रचला संभलची डेमोग्राफी बदलण्याचा कट, हिंदूंना ठरवून लक्ष्य केलं गेलं! मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा मोठा दावा
16
'बिहारसाठी मीच योग्य', तेजस्वी यादवांनी राहुल गांधींसमोर मुख्यमंत्रिपदावर ठोकला दावा
17
विरार इमारत दुर्घटना प्रकरण; विकासक, जागामालकांसह ५ जणांना अटक
18
'भारतामुळे पाकिस्तानात पूर', डोनाल्ड ट्रम्प असे बोललेच नाही, व्हायरल व्हिडीओचं सत्य काय?
19
Nagpur Crime: एंजेलसारखीच मोनिकाची झाली होती हत्या; नागपुरात ११ मार्च २०११ रोजी काय घडलं होतं?
20
सरकारसोबतची पहिली बैठक अयशस्वी; तुम्ही आमच्या जीवाशी खेळताय, मनोज जरांगे पाटील संतापले

India China FaceOff: भारताच्या ३८००० चौरस किलोमीटर जमिनीवर चीनचा अवैध कब्जा- राजनाथ सिंह

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2020 16:46 IST

India China FaceOff: भारतीय जवान देशाचं संरक्षण करण्यास पूर्णपणे समर्थ; राजनाथ यांची ग्वाही

नवी दिल्ली: चीनला लागून असलेल्या सीमावर्ती भागातला तणाव वाढला आहे. याचे पडसाद संसदेच्या पावसाळी अधिवेशनात पाहायला मिळाले. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सीमेवरील तणावपूर्ण स्थितीची माहिती राज्यसभेत दिली. पूर्व लडाखमध्ये आपण आव्हानात्मक परिस्थितीचा सामना करत आहोत. सीमेवरील तणाव शांततेच्या मार्गानं सोडवण्याचा आपला प्रयत्न आहे. भारतीय जवान देशाचं संरक्षण करण्यास पूर्णपणे समर्थ आहेत, अशी ग्वाही त्यांनी दिली. भारताविरोधात चीनचा नवा डाव! सीमेवर लाऊड स्पीकर बसवून वाजवतायेत पंजाबी गाणीचीननं भारताच्या भूमीवर अनधिकृतपणे कब्जा केल्याचं राजनाथ सिंह यांनी संसदेत सांगितलं. 'भारताच्या ३८  हजार चौरस किलोमीटर जमिनीवर चीनचा कब्जा आहे. १९६३ मधील एका तथाकथित सीमा कराराअंतर्गत पाकिस्ताननं पाकव्याप्त काश्मीरमधील ५ हजार १८० चौरस किलोमीटर भारतीय जमीन अवैधपणे चीनला सोपवली आहे. याशिवाय अरुणाचल प्रदेशच्या सीमावर्ती भागातील जवळपास ९० हजार चौरस किलोमीटरवर चीननं दावा सांगितला आहे,' अशी माहिती राजनाथ यांनी दिली.पाच कलमी कार्यक्रम राबवा अन्यथा युद्धासाठी तयार राहा, चीनची भारताला धमकी१५ जूनला गलवान खोऱ्यात भारत आणि चीनचे जवान भिडले. त्यावेळी दोन्ही सैन्यात रक्तरंजित संघर्ष झाला. त्या रात्री नेमकं काय घडलं, याची माहितीदेखील राजनाथ यांनी दिली. '१५ जूनला कर्नल संतोष बाबू यांच्यासह देशाच्या १९ शूर जवानांनी भारताच्या संरक्षणासाठी गलवान खोऱ्यात सर्वोच्च बलिदान दिलं. आपले पंतप्रधान सैन्याचं मनोधैर्य उंचावण्यासाठी लडाखला गेले,' असं राजनाथ म्हणाले.हा कसला बहिष्कार?... 1600हून जास्त भारतीय कंपन्यांमध्ये चीनची 7500 कोटींची गुंतवणूकभारत शांततेच्या मार्गानं प्रश्न सोडवण्यास तयार आहे. तीच भारताची भूमिका आहे. मात्र चीन औपचारिक सीमा मान्य करायला तयार नाही. त्यामुळे सीमावर्ती भागातील तणाव वाढत आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेबद्दल दोन्ही देशांमध्ये एकमत नाही. शांततेसाठी करण्यात आलेल्या करारांचं चीनकडून वारंवार उल्लंघन सुरू आहे, असं राजनाथ सिंह यांनी संसदेला सांगितलं. आम्ही देशाची मान झुकू देणार नाही. कोणीही आमच्यासमोर मान तुकवावी, हे आमचं उद्दिष्ट नाही. पण आम्हीही कोणासमोर मान झुकवणार नाही, अशा शब्दांत त्यांनी चीनला अप्रत्यक्ष इशारा दिला.

टॅग्स :india china faceoffभारत-चीन तणावRajnath Singhराजनाथ सिंह