शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
3
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
4
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
5
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
6
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
7
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
8
"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
9
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
10
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
11
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
12
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
13
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
14
कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार
15
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : उद्धव ठाकरेंकडूनच कोल्हापूरच्या गादीचा अपमान, उदय सामंत यांचा आरोप
16
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...
17
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
18
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
19
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
20
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे

India China FaceOff: डोकलाममध्ये पुन्हा संघर्ष पेटणार?; चीनकडून बोगद्याचं काम वेगानं सुरू

By कुणाल गवाणकर | Published: November 09, 2020 11:19 PM

India China FaceOff: हिवाळ्यात विनाअडथळा सीमेवर पोहोचण्यासाठी चीनच्या वेगवान हालचाली

नवी दिल्ली: पूर्व लडाखमध्ये भारत आणि चीनमधील तणाव गेल्या काही महिन्यांपासून वाढला असताना आता डोकलाम परिसरातही संघर्ष पेटण्याची चिन्हं आहेत. चीननं डोकलाममधल्या पठारी भागात रस्त्यांची कामं सुरू केली आहेत. एनडीटीव्हीनं सॅटेलाईट फोटोंचा संदर्भ देऊन याबद्दलचं वृत्त दिलं आहे. कोणत्याही ऋतूत या भागांत पोहोचता यावं यासाठी चीनकडून बोगद्याचं काम अतिशय वेगानं सुरू आहे.२०१७ मध्ये भारत आणि चीनचं सैन्य डोकलाममध्ये आमनेसामने आलं होतं. त्यामुळे काही आठवडे परिस्थिती अतिशय तणावाची होती. ऑगस्ट २०१९ मध्ये डोकलाममध्ये एक बोगदा तयार करण्यात आला. हा बोगदा मेरूग ला पासमधून जातो. हा बोगदा सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या उत्तर मार्गाचा भाग आहे. ऑगस्ट २०१९ आणि ऑक्टोबर २०२० चे फोटो पाहिल्यास या भागात चीननं बोगद्याचं काम अतिशय वेगानं केल्याचं लक्षात येतं.

छायाचित्र सौजन्य- एनडीटीव्ही
डोकलाममध्ये कोणत्याही अडथळ्यांविना पोहोचण्यासाठी चीन प्रयत्न करत असल्याची माहिती लष्करी अभ्यासकांनी दिली. थंडीच्या दिवसांत या भागांत प्रचंड बर्फवृष्टी होते. त्यामुळे या भागातून वाहतूक करणं आव्हानात्मक होतं. त्यामुळेच चीननं या भागात बोगदा तयार केला आहे. पूर्व लडाखमधील भारत-चीनमधील तणाव निवळलेला नाही. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये वारंवार संघर्षाची परिस्थिती निर्माण होत आहे. चिनी सैन्यानं भारतीय हद्दीत घुसण्याचेही प्रयत्न केले आहेत.
छायाचित्र सौजन्य- एनडीटीव्ही
भारत आणि चीनमध्ये जून ते ऑगस्ट २०१७ दरम्यान डोकलाममध्ये संघर्ष निर्माण झाला होता. दोन्ही देशांचे जवान ७० पेक्षा अधिक दिवस आमनेसामने उभे ठाकले होते. सिक्कीम, भूतान आणि चीनच्या सीमावर्ती भागात असलेल्या डोकलामध्ये २०१७ मध्ये कच्चा रस्ता होता. मात्र आता या भागात चीननं पक्का रस्ता तयार केला आहे. चीनकडून असलेला धोका लक्षात घेऊन भारतानंदेखील रस्त्यांच्या कामांना वेग दिला आहे. डोकलाममध्ये फौजफाटा कमी वेळात पोहोचवा, यासाठी भारतानं सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या भागांमध्ये दळणवळणाच्या सुविधा वाढवण्यावर विशेष भर दिला आहे.

टॅग्स :india china faceoffभारत-चीन तणावDoklamडोकलाम