शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

India China Face Off: मोदी यांनी सत्य परिस्थिती देशाला सांगावी; विरोधकांची जोरदार मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2020 03:00 IST

विरोधकांच्या प्रचंड दबाबानंतर मोदी यांनी सैनिकांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही व भारत योग्य त्या कारवाईसाठी पूर्णपणे सक्षम आहे, असे म्हटले.

- शीलेश शर्मानवी दिल्ली : नियंत्रण रेषेवर चिनी सैनिकांशी झालेल्या संघर्षात शहीद झालेल्या भारतीय सैनिकांवरून सगळे विरोधक एका स्वरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाळगलेल्या मौनावर प्रश्न विचारत आहेत. विरोधकांच्या प्रचंड दबाबानंतर मोदी यांनी सैनिकांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही व भारत योग्य त्या कारवाईसाठी पूर्णपणे सक्षम आहे, असे म्हटले. मोदी म्हणाले की, तरीही आम्हाला शांतता हवी आहे.मोदी यांच्या या वक्तव्यानंतरही विरोधकांचे समाधान झालेले नाही. त्यांनी म्हटले की, मोदी यांंनी हे स्पष्टपणे हे देशाला सांगावे की, सीमेवर परिस्थिती काय आहे? त्या आधी काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी मोदी यांना विचारले होते की, चीनने आमच्या भूभागावर ताबा कसा मिळवला? २० जवानांचे हौतात्म्य का झाले? घटनास्थळी आज काय परिस्थिती आहे? आमचे सैन्य अधिकारी आणि जवान अजूनही बेपत्ता आहेत का? किती सैनिक गंभीर जखमी झाले आहेत? चीनने भारताच्या कोणत्या भूभागावर ताबा मिळवला, याची उत्तरे सरकारने द्यावीत.मोदी यांच्या वक्तव्यानंतरही काँगे्रस विचारत आहे की, जे प्रश्न सोनिया गांधी यांनी विचारले त्यांचे मोदी यांनी कोणतेही उत्तर दिलेले नाही. सूत्रांनुसार सर्वपक्षीय बैठकीत काँग्रेस आपल्या मित्र पक्षांना सोबत घेऊन याच प्रश्नांची उत्तरे सरकारकडे मागेल.लडाख प्रकरणावरून मंगळवारपासूनच सरकार प्रश्नांनी घेरले होते. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सकाळी व्हिडिओ संदेशाच्या माध्यमातून मोदी यांना विचारले की ‘पंतप्रधान गप्प का आहेत, ते लपून का बसले आहेत, फार झाले, काय झाले हे आम्हाला माहिती करून घ्यायचे आहे.’चीनने कशी हिंमत केली की, आमचे जवान मृत्यू पावले. त्याची हिंमत कशी झाली की, आमची जमीन त्याने कब्ज्यात घेतली? राहुल यांनी मोदी यांच्या मौनावर प्रश्न विचारल्यानंतर जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनीही म्हटले की, सरकारला प्रश्न विचारावेत तर त्याला राष्ट्रविरोधी घोषित केले जाते. पंतप्रधानांनी हे सांगायला हवे की, परिस्थिती काय आहे. समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी शहीद झालेल्या सैनिकांबद्दल सहवेदना व्यक्त करताना म्हटले की, सीमेवर काय परिस्थिती आहे, हे कोणालाच माहिती नाही व सरकारही त्याविषयी सांगत नाही. त्यांचे थेट लक्ष्य होते ते मोदी यांनी मौन सोडावे. माजी पंतप्रधान एच.डी. देवगौडा यांनी सरकारला विचारले की, जेव्हा वाद कमी करण्याचा प्रयत्न होत होता, तर आमचे सैनिक कसे मारले गेले? देशाचे हित यात आहे की, मोदी व संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी प्रामाणिकपणे वस्तुस्थिती देशाला सांगावी.मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पॉलिटब्युरोने औपचारिक निवेदनाद्वारे सरकारकडे मागणी केली की, पूर्व लडाखमधील घटनाक्रमावर पूर्ण जबाबदारीने निवेदन केले जावे. पक्षाने सरकारने बाळगलेल्या मौनावरही प्रश्न विचारला आहे. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी टिष्ट्वटरवर म्हटले की, ‘आमची धरणी माता, आमचे सार्वभौमत्व धोक्यात आले आहे. आमचे जवान शहीद होत असताना आम्ही गप्प बसून राहावे? भारतीय जनतेला सत्य समजलेच पाहिजे.’ काँग्रेसच्या अध्यक्षांकडून पक्षाने औपचारिक निवेदन जारी करून देशाच्या अखंडतेसाठी काँग्रेस सरकारसोबत उभी आहे; परंतु मोदी यांनी सत्य सांगितले पाहिजे. सगळ्यांना विश्वासातही घेतले पाहिजे, असे त्यात म्हटले.शहीद झालेले जवानकर्नल बिकुमल्ला संतोष बाबू (हैदराबाद), नायब सुभेदार नुदुराम सोरेन (मयूरभंज), नायब सुभेदार मनदीप सिंग (पटियाला), नायब सुभेदार सतनाम सिंग (गुरुदासपूर), हवालदार के. पलानी (मदुराई), हवालदार सुनील कुमार (पाटणा), हवालदार बिपुल राय (मेरठ शहर), जवान दीपक कुमार (रेवा), राजेश ओरांग (बिरघुम), कुंदन कुमार ओझा (साहिबगंज), गणेश राम (कांकेर), चंद्रकांत प्रधान (कंधामल), अंकुश (हमीरपूर), गुरबिंदर (संगरूर), गुरतेज सिंग (मानसा), चंदन कुमार (भोजपूर), कुंदन कुमार (सहारसा), अमन कुमार (समस्तीपूर), जय किशोर सिंह (वैशाली), गणेश हंसदा (पूर्व सिंघभूम)

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी