शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

India China Face Off: पंतप्रधानांनी उद्या बोलावली सर्वपक्षीय बैठक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2020 02:57 IST

पंतप्रधान कार्यालयाने केलेल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, भारत व चीनच्या सीमेवर सुरू असलेल्या घडामोडींवर चर्चा करण्यासाठी शुक्रवारी संध्याकाळी पाच वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून आयोजिलेल्या बैठकीत सर्व पक्षांच्या अध्यक्षांना बोलाविण्यात आले आहे.

पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात भारत व चीनच्या सैनिकांमध्ये झालेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी, १९ जून रोजी सर्वपक्षीय बैठक बोलाविली आहे.यासंदर्भात पंतप्रधान कार्यालयाने केलेल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, भारत व चीनच्या सीमेवर सुरू असलेल्या घडामोडींवर चर्चा करण्यासाठी शुक्रवारी संध्याकाळी पाच वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून आयोजिलेल्या बैठकीत सर्व पक्षांच्या अध्यक्षांना बोलाविण्यात आले आहे.गलवान खोºयाचा भाग आमचाच; चीनचा हेका कायमबीजिंग : लडाखमधील गलवान खोºयाचा भाग आमचाच असून त्यावर दुसºया कोणाचाही हक्क नाही, असा दावा चीनने केला आहे.43 चिनी सैनिक सोमवारी रात्री भारताबरोबर झालेल्या संघर्षात जखमी वा मृत झाले का याबाबत कोणतीही माहिती देण्यास त्या देशाच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियान यांनी नकार दिला.लिजियान म्हणाले की, गलवान खोºयाचा प्रश्न भारतीय व चिनी लष्कर व्यवस्थितरीत्या हाताळत आहे. आपले किती जवान शहीद झाले याची माहिती भारताने जाहीर केली आहे. त्या पार्श्वभूमीवर चीनने आपल्या जवानांबाबत काहीच माहिती दिलेली नाही. याबाबत लिजियान यांनी कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करण्यास नकार दिला.सीमेवरील घटना अस्वस्थ करणारी राजनाथसिंह; शहीद सैनिकांना आदरांजली20 भारतीय जवान लडाखमधील गलवान खोºयात सोमवारी रात्री झालेल्या संघर्षात शहीद झाले. ही अत्यंत अस्वस्थ करणारी व वेदनादायी घटना आहे असे केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी बुधवारी म्हटले आहे. त्यांनी शहीद जवानांना आदरांजली अर्पण केली आहे.राजनाथसिंह यांनी का टष्ट्वीटमध्ये म्हटले आहे की, भारतीय जवानांनी आपल्या सीमेचे रक्षण करताना, शौर्याची पराकाष्ठा केली व बलिदानही केले. भारतीय लष्कराच्या पराक्रमी परंपरेला साजेसा असाच आपल्या सैनिकांचा त्याग आहे. या सैनिकांच्या कुटुंबियांच्या दु:खात मी व सारा देश सहभागी आहे. अतुलनीय शौर्य दाखविणाºया भारतीय सैनिकांना सलाम असेही त्यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीchinaचीन