शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानचं भारताविरोधात नवं कारस्थान; गिलगिट-बाल्टिस्तानमध्ये तैनात केले २०००० सैनिक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2020 13:09 IST

पाकिस्तानकडून दोन आघाड्यांच्या युद्धाची तयारी सुरू असल्याचे गुप्तचर यंत्रणांचे म्हणणे आहे.

नवी दिल्लीः लडाखमधील वास्तविक नियंत्रण रेषे(LAC)वर भारत आणि चीनमधील सुरू असलेल्या तणावाचा फायदा घेण्यासाठी पाकिस्तान प्रयत्नशील आहे. भारतीय गुप्तचर यंत्रणांच्या माहितीनुसार, पाकिस्तानी लष्कराने उत्तर लडाखमध्ये सैन्याची तैनाती वाढवली आहे. त्यासोबतच चिनी सैन्याची दहशतवादी संघटना अल बद्रशी चर्चा सुरू असल्याचीही माहिती समोर आली आहे, गुप्तचर यंत्रणांनी ही माहिती दिली आहे. पाकिस्तानने आपल्या सैनिकांचे दोन गट गिलगिट-बाल्टिस्तान भागात तैनात केले आहेत. उत्तर लडाखमध्ये सुमारे 20 हजार अतिरिक्त सैनिक पाकिस्तानकडून तैनात करण्यात आले आहेत. पाकिस्तानकडून दोन आघाड्यांच्या युद्धाची तयारी सुरू असल्याचे गुप्तचर यंत्रणांचे म्हणणे आहे.विशेष म्हणजे चिनी सैन्याने जम्मू-काश्मीरमध्ये हिंसाचार पसरवण्यासाठी दहशतवादी संघटना अल बद्र यांच्याशी बोलली सुरू केली आहेत. पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया वाढविण्याची तसेच बॅट ऑपरेशन पुढे नेण्याचा विचार करीत आहे. यासाठी काश्मीरमध्ये उपस्थित असलेल्या 100 दहशतवाद्यांची मदत घेतली जाऊ शकते, असे सूत्रांचे म्हणणे आहे. जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरुद्ध भारतीय सुरक्षा दलांचे अभियान सुरू आहे आणि नुकतेच 120हून अधिक दहशतवाद्यांना ठार करण्यात आलं आहे. ठार झालेल्यांमध्ये काही विदेशी दहशतवादीच होते.सुरक्षा दलाच्या कारवायांमुळे पाकिस्तानचे सर्वच प्लॅन फिस्कटत आहेत आणि नवीन डावपेचांचा अवलंब केला जात आहे. दोन आघाड्यांवर युद्ध झाल्यास पाकिस्तानने काश्मीरमध्ये उपस्थित असलेल्या दहशतवाद्यांकडून सुरक्षा दलांवर हल्ला करण्याची योजना आखली आहे. या इनपुटनंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत आणि आवश्यक पावले उचलली जात आहेत.

काश्मीरमध्ये सीआरपीएफच्या पथकावर दहशतवादी हल्ला; एक जवान शहीद, दोन गंभीर जखमी

आज दहशतवाद्यांनी काश्मीरच्या सोपोरमध्ये केंद्रीय राखील पोलीस दलाच्या पथकावर हल्ला केला. यामध्ये एका जवानाला वीरमरण आलं. तर आणखी तीन जण जखमी झाले आहेत. त्यातल्या दोघांची प्रकृती गंभीर आहे. सोपोरमध्ये निगराणी करणाऱ्या सीआरपीएफच्या पथकावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. त्यामध्ये चार जवान आणि एक नागरिक झाला. त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यापैकी एका जवानाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती एएनआयनं दिली. तर दोन जवानांची प्रकृती गंभीर आहे. दहशतवाद्यांच्या हल्ल्यात एका नागरिकाचा मृत्यू झाला आहे.

हेही वाचा

TikTok बंद झाल्यानं Chingariला मिळाली हवा, आनंद महिंद्राही ट्विट करत म्हणाले...

यंदा गणेशोत्सव साजरा करणार नाही; लालबागचा राजा मंडळाचा ऐतिहासिक निर्णय

CoronaVirus : पतंजलीच्या कोरोनिलला अखेर आयुष मंत्रालयाची मान्यता; पण घातली महत्त्वाची अट…

केंद्रीय मंत्रिमंडळात लवकरच खांदेपालट; ज्योतिरादित्य शिंदेंना संधी मिळणार

आजचे राशीभविष्य - 1 जुलै 2020; 'या' राशीच्या व्यक्तींना आजचा दिवस लाभदायी

टॅग्स :terroristदहशतवादीPakistanपाकिस्तान